चीनवर विश्वास ठेवता येणार नाही! लष्कर प्रमुखांचं मोठं विधान
लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा, चीन, पाकिस्तानसह इतर आव्हानांवर स्पष्टपणे मतं मांडली. हिंदुस्थानचे लष्कर कुठल्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले. जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी चीन आणि पाकिस्तानबाबत मोठे विधानही केले. चीनवर विश्वास ठेवता येणार नाही. तर पाकिस्तान दहशतवाद रोखण्यात कोणतीही ठोस पावले उचलत नाहीये, असे जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले.
हिंदुस्थानचे लष्कर आधुनिक तंत्रज्ञान वेगाने आत्मसात करत आहेत. आणि कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. हिंदुस्थानचे लष्कर ड्रोन टेक्नॉलॉजीसह नव्या लष्करी क्षमतांवर सातत्याने काम करत आहेत, असे जनरल द्विवेदी पुढे म्हणाले. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते.
हिंदुस्थानकडे असे अत्याधुनिक ड्रोन आहेत की जे AK-47 चालवू शकतात आणि क्षेपणास्त्र डागू शकतात. चीन ड्रोनद्वारे हल्ला करत असेल तर हिंदुस्थानही तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे, जनरल द्विवेदी म्हणाले. तसेच चीनवर विश्वास ठेवता येणार नाही, असे जनरल द्विवेदी यांनी स्पष्टपणे सांगितले. युद्ध कोणत्याही देशासाठी हिताचे नसते. पण गरज पडल्यास हिंदुस्थानचे लष्कर पूर्ण तयारीने प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे, असे जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले.
हिरोशिमा, नागासाकी हल्ला आठवतोय ना, त्यापेक्षा जास्त वेदना देऊ! चीनकडून जपानला अणुबॉम्बची धमकी
पूर्व लडाखमधील डेपसांग आणि डेमचोक भागात 2020 मध्ये हिंदुस्थानचे जवान आणि चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यानंतर आता सीमेवरील स्थिती सामान्य आहे. शांतता राखण्यासाठी गरज भासल्यास दोन्ही देशांकडून वेळोवेळी चर्चेद्वारे समस्यांवर तोडगा काढला जातो, अशी माहिती लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List