लोणावळ्याचे सौंदर्य आणखी खुलणार , नगरपरिषदेचा 129 कोटींचा अर्थसंकल्प; पर्यटन योजनांवर भर
लोणावळा नगरपरिषदेचा 129 कोटी 19 लाख 98 हजार 952 रुपयांचा 2025-2026 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मंजूर झाला आहे. या अर्थसंकल्पामध्ये पर्यटन व विकास योजनांना चालना देण्यात आली आहे. त्यामुळे लोणावळा शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी अशोक साबळे यांनी हा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. अर्थसंकल्पात शहर सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी खास तरतूद करण्यात आली आहे
लोणावळा नगरपरिषदेच्या मालमत्ता तसेच शहरातील काही मुख्य ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्यासाठी 50 लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. लोणावळा शहरातील डांबरी रस्त्यांसाठी तब्बल 7 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक सुविधा आणि संपर्क मार्गामध्ये सुधारणा होणार आहे. भुयारी गटार योजना राबविण्यासाठी 2 कोटी 80 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पातील मुख्य योजना व तरतूद
■ लोणावळा शहरातील वलवण तलाव विकास योजनेसाठी नवीन हेड तयार करण्यासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर लोणावळा नगरपरिषदेच्या तुंगार्ली डॅम येथे मनोरंजन नगरी व विविध विकासकामांच्या प्राथमिक खर्चासाठी 30 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामामुळे पर्यटननगरी लोणावळा शहर आणखी आकर्षक बनेल व पर्यटन वाढीस मदत होईल, असे नगरपरिषदेचे नियोजन्क़ा आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List