अपहरणाआधी पप्पांना वाल्मिकचे लोकं वारंवार जीवे मारण्याची धमकी देत होते, वैभवी देशमुखने पोलिसांकडे नोंदवला जबाब
‘माझं काही बरं वाईट झाल्यास आई आणि विराजची काळजी घे, पप्पाचं अपहरणाआधीचं हे वाक्य असल्याचं, संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख म्हणाली आहे. वैभवीने याप्रकरणी पोलिसात आपला जबाब नोंदवला आहे. आपल्या जबाबात ती असं म्हणाली आहे.
पोलिसात आपला जबाब नोंदवताना वैभवी देशमुख म्हणाली आहे की, “शिक्षणासाठी मी माझ्या आई आणि भावासोबत लातूरला राहायचे. त्यामुळे माझे पप्पा नेहमीच आम्हाला भेटण्यासाठी मस्साजोगवरुन लातूरला यायचे. 7 डिसेंबर 2024 रोजी रात्री उशिरा माझे पप्पा मस्साजोग येथून लातूरला आले होते. त्या दिवशी ते बरेच अस्वस्थ असल्याचे मला दिसले. मी त्यांना काय झाले म्हणून विचारले, तेव्हा त्यांनी मला जवळ घेऊन सांगितले की, बाळा चांगला अभ्यास कर… त्यानंतरही मी वारंवार त्यांना विचारणा केली. तेव्हा त्यांनी मला 6 डिसेंबर 2024 रोजी आवादा कंपनीमध्ये वाल्मिक अण्णांची माणसे खंडणी मागण्याकरता आणि कंपनी बंद करण्याकरिता कंपनीत आल्यानंतर मी त्यांना अडविले होते, असे सांगितले. तसेच कराड गँगची माणसे मला जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचेही त्यांनी मला सांगितले.”
आपल्या जबाबात ती पुढे म्हणाली की, “वाल्मिक कराडचा खास माणूस विष्णु चाटे फोन करुन ठार मारण्याची धमकी देत आहे. त्यामुळे मला टेन्शन आलं आहे, असं पप्पांनी सांगितलं होतं. माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे… असे ते मला म्हणाले. त्यावर मी त्यांची समजूत काढली. तुम्ही स्वतःसाठी काही करत नाहीत. तुम्ही गावासाठीच करताय, त्यामुळे काही चिंता करू नका, असे म्हणून मी त्यांना धीर दिला.परंतु तरीही पप्पा खूप घाबरलेले होते.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List