जयपूरमध्ये आजपासून आयफा अवॉर्ड
आंतरराष्ट्रीय इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड (आयफा) उद्या, रविवारपासून राजस्थानच्या पिंकी सिटी म्हणजेच जयपूरमध्ये सुरू होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी शनिवारी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आपली मुलगी राहा कपूरसोबत मुंबईतून रवाना झाले, तर करिना कपूर आपल्या दोन्ही मुलांसोबत मुंबई एअरपोर्टवर दिसली. बॉलीवूडमधील अनेक जण जयपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. अभिनेता कार्तिक आर्यन आणि दिग्दर्शक करण जोहर हे दोघे या कार्यक्रमाला होस्ट करतील, तर या सोहळ्यात शाहरुख खान, माधुरी दीक्षित, करिना कपूर, शाहिद कपूर, मिका सिंह, नोरा फतेही यांच्यासह अनेक कलाकार आपला परफॉर्मन्स स्टेजवर दाखवताना दिसतील.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List