Buldhana News – शिर्डीला दर्शनासाठी चालले होते भाविक, वाटेत कारचा टायर फुटला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

Buldhana News – शिर्डीला दर्शनासाठी चालले होते भाविक, वाटेत कारचा टायर फुटला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

शिर्डीला दर्शनासाठी जात असताना समृद्धी महामार्गावर कारचे टायर फुटल्याने भीषण अपघाताची घटना शनिवारी सकाळी बुलढाण्यात घडली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. माळसावरगाव येथे मुंबई कॅरिडोरच्या 344.7 क्रमांकाच्या चायनिज पॉईंटजवळ हा अपघात झाला.

यवतमाळ जिल्ह्यातील आसेगाव देवी (तालुका बाभुळगाव) येथील भाविक क्रूझर गाडीने शिर्डी येथे दर्शनासाठी निघाले होते. मात्र, वाटेतच त्यांच्या वाहनाचा टायर फुटल्याने गाडी अनियंत्रित होऊन महामार्गावर उलटली. यादरम्यान मागून भरधाव वेगात येणार्‍या क्रेटा कारने क्रूझरला जोरदार धडक दिली.

या अपघातात विद्याबाई साबळे (55) आणि मोतीराम बोरकर (60) यांचा मृत्यू झाला. तर 13 जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. भावना रमेश राऊत (30), प्रतिभा अरुण वाघोडे (45), मीरा गोटफोडे (65), संतोष साखरकर (28), कमला जाधव (55), सुशिला जाणार (52), मीरा राऊत (60), छायाबाई चव्हाण (65), प्रमिला घाटोळ (60), भक्ती राऊत (5), रमेश राऊत (40), बेबीबाई येलोत (60) अशी जखमींची नावे आहेत.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, सिंदखेडराजा पोलीस ठाण्याचे कर्मचारी, तसेच ‘क्यूआरव्ही टीम’ घटनास्थळी दाखल झाली. महामार्ग पोलीस पीएसआय गजानन उज्जैनकर आणि त्यांच्या टीमने जखमींना रुग्णालयात दाखल केले. तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या पथकाने मृतदेह बाहेर काढून वाहने महामार्गाच्या बाजूला हलवल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘सर्वात मोठा फेक नरेटिव्ह म्हणजे…’, संजय राऊतांचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल ‘सर्वात मोठा फेक नरेटिव्ह म्हणजे…’, संजय राऊतांचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मुलुंडमध्ये...
व्यापाऱ्यांकडून ‘गुंडा टॅक्स’ची वसुली, व्हिडिओ कॉलवर मुलांच्या हत्येची धमकी, मुंबई पोलिसांनी त्याला असे पकडले?
‘राज्य मी आणणार, त्यांना सोडणार नाही, विरोधकांची दांडी उडवणार…’, उद्धव ठाकरे यांचा कोणा कोणावर हल्ला?
‘राज ठाकरेंना ‘ती’ गोष्ट समजत नाही..’, गंगेबद्दलच्या वक्तव्यावरून गुणरत्न सदावर्ते संतापले
भाजप हिंदुत्ववादी, देशप्रेमी आहे हेच फेक नरेटीव्ह; निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे जबरदस्त फटकारे
गणपत गायकवाडांचे नाव घेऊ नको, अन्यथा तुझे बाबा सिद्दीकी करू…शिवसेना नेते महेश गायकवाड यांना धमकी
आम्हाला वाटलं हा डिप्रेशनमध्ये आहे; घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलसोबत दिसणारी ‘मिस्ट्री गर्ल’ कोण?