हिंदुस्थानने रशियाकडून शस्त्रे खरेदी करण्यावर अमेरिकेचा आक्षेप, ट्रम्पच्या मंत्र्यांनी केलं मोठं वक्तव्य
अमेरिकन उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करण्याचा वाद अद्यापही सुरूच आहे. यातच आता अमेरिकेने हिंदुस्थानने रशियाकडून शस्त्रास्त्रे खरेदी करण्यावर आक्षेप घेतला आहे. अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक म्हणाले आहेत की, “हिंदुस्थानने रशियन शस्त्रांवरील अवलंबित्व संपवावे. असे केल्याने हिंदुस्थान आणि अमेरिकेतील संबंध आणखी मजबूत होतील.” इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये ते असं म्हणाले आहेत.
हॉवर्ड लुटनिक म्हणाले की, ”अमेरिकन वस्तूंवर सर्वाधिक कर लावणाऱ्या देशांमध्ये हिंदुस्थानचा समावेश आहे. ते म्हणाले की, हिंदुस्थान मोठ्या प्रमाणात रशियाकडून लष्करी उपकरणे खरेदी खरेदी करतो. जे पूर्णपणे संपलं पाहिजे. तसेच हिंदुस्थान बऱ्याच काळापासून रशियाकडून पेट्रोलियम तसेच शस्त्रास्त्रे खरेदी करत आहे. पर्याय म्हणून अमेरिका हिंदुस्थानला आधुनिक शस्त्रे पुरवण्यास तयार आहे, असं ते म्हणाले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List