Pune News – भररस्त्यात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजावर येरवडा पोलिसात गुन्हा दाखल
पुण्यात शनिवारी सकाळी अतिशय घृणास्पद प्रकार घडला. बीएमडब्लू कारमधून आलेल्या मद्यधुंद तरुणाने भररस्त्यात अश्लील चाळे करत सिग्नलवरच लघुशंका केल्याची घटना येरवडा परिसरात घडली. गौरव आहुजा असं आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी गौरवसह त्याच्या मित्राविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गौरव आहुजा आणि मनोज आहुजा यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आलं आहे. आहुजा बापलेक जुगाराच्या धंद्यात सक्रिय आहेत. आहुजा बापलेक पोकर गेम, क्रिकेट सामन्यांवर बेटिंग लावणे आणि मटका व्यवसाय चालवतात. जुगाराच्या पैशातून हे बापलेक हॉटेल व्यवसायात गुंतवणूक करायचे.
त्याने सिग्नलवर नाही तर…
गौरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते. त्याने सिग्नलवर लघुशंका शंका केली नाही तर माझ्या तोंडावर केली आहे, अशा शब्दात मनोज आहुजा यांनी संताप व्यक्त केला आहे. मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे, असं मनोज आहुजा यांनी पुढे म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List