‘मोदींची गॅरंटी नाही, फक्त जुमला’, भाजपच्या महिला समृद्धी योजनेवर आतिशी यांची टीका
राज्यात विधानसभा निवडणुकीआधी महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यात आश्वासन दिलं. मात्र हा फक्त चुनावी जुमला ठरला. अद्यापही राज्यातील लाडक्या बहिणी 2100 रुपयांच्या प्रतीक्षेत आहेत. यातच दिल्लीतील भाजप सरकारने दिल्लीत महिला समृद्धी योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा 2500 रुपये दिले जातील, असं बोललं जात आहे. यावरच आता दिल्ली विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी आपली प्रतिक्रिया देत भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसेच ही योजना म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जुमला असल्याची टीका त्यांनी केली आहे.
भाजपच्या या योजनेवर टीका करत आतिशी म्हणाल्या आहेत की, “दिल्ली निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींनी महिलांना आश्वासन दिले होते की, 8 मार्चपासून दरमहा त्यांच्या बँक खात्यात 2500 रुपये जमा केले जातील. त्यांनी म्हटले होते की, ही मोदींची गॅरंटी आहे. आज महिला त्यांच्या फोनवर मेसेजची वाट पाहत राहिल्या. भाजप सरकारने हे सिद्ध केले की, ही मोदींची गॅरंटी नव्हती तर, जुमला होता.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List