मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन, 94व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक मालिका, सिनेमे, नाटकांमध्ये दमदार भूमिका जबावणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचं निधन झालं झालं. वयाच्या 94 व्या वर्षी प्रेमा साखरदांडे यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. प्रेमा साखरदांडे यांच्या निधनानंतर मराठी सिनेविश्वाचं मोठं नुकसान झालंय असं म्हणायला हरकत नाही. तर प्रेमा साखरदांडे यांच्या कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रेमा साखरदांडे यांनी माहीन येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री १०च्या सुमारास वृद्धापकाळानं निधन झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरा दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत प्रेमा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
प्रेमा साखरदांडे यांच्या पश्चात त्यांच्या कन्या आहेत. हिज मास्टर्स व्हॉइस या ध्वनिमुद्रिका बनविणाऱ्या कंपनीत ध्वनिमुद्रक असलेल्या वसंतराव कामेरकर यांच्या प्रेमा साखरदांडे कन्या होत्या. त्यांना 10 भावंडे होती.
प्रेमा साखरदांडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘शालेय रंगभूमी’ हे पुस्तर त्यांनी लिहिलं आहे. तर, रंगभूमीवर त्यांना प्रेमाताई या नावाने ओळखलं जायचं. त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘स्पेशल 26’, ‘द इम्पॉसिबल मर्डर’ ‘मनन’, ‘माझे मन तुझे झाले’, ‘सावित्री बनो’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List