गोविंदावर दु:खाचा डोंगर कोसळला, सावलीच हरवली, अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू

गोविंदावर दु:खाचा डोंगर कोसळला, सावलीच हरवली, अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू

घटस्फोटाच्या चर्चेने अभिनेता गोविंदा चांगलाच अडचणीत आलेला आहे. सध्या मीडियात गोविंदाच्या घटस्फोटाचीच चर्चा सुरू आहे. असं असतानाच आता गोविंदावर दु;खाचा डोंगर कोसळला आहे. गोविंदाची सावली असलेल्या आणि अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गोविंदा एकाकी पडला आहे. गोविंदाचे माजी सेक्रेटरी शशी प्रभू यांचं 6 मार्च रोजी निधन झालं आहे. शशी प्रभू यांच्या निधानाची बातमी कळताच गोविंदा त्यांच्या घरी पोहोचले. आणि प्रभू यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. प्रभू केवळ गोविंदाचे सेक्रेटरीच नव्हते तर जिगरी दोस्तही होते.

शशि यांच्या घरी गोविंदा गेल्यानंतर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत गोविंदा रडताना दिसत आहे. डोळे पुसताना दिसत आहे. शशी प्रभू यांनी गोविंदाला 1986 पासून साथ दिली होती. त्यावेळी गोविंदाचा इल्जाम हा सिनेमा रिलीज झाला होता. शशी प्रभू हे गोविंदाच्या कुटुंबाचा एक भाग होते. त्यांचे गोविंदाच्या कुटुंबाशी चांगले संबंध होते. गुरुवार 6 मार्च रोजी संध्याकाळी शशी प्रभू यांचं निधन झालं. ही बातमी कळताच गोविंदाने बोरिवली येथील प्रभू यांच्या घरी भेट दिली. प्रभू यांच्या अंतिम संस्काराला अनेक बडे स्टार येणार असल्याचं सांगितलं जातं.

चार दिवसांपूर्वीच सर्जरी

गोविंदाचा दुसरा सेक्रेटरी शशी सिन्हा यांनी शशी प्रभू यांच्या निधानाचं वृत्त दिलं आहे. हृदयाशी संबंधित आजारामुळे शशी प्रभू यांचं निधन झाल्याचं शशी सिन्हा यांनी सांगितलं. चार दिवसांपूर्वीच त्यांची सर्जरी झाली होती. त्यानंतर त्यांना घरी आणण्यात आलं होतं. पण ते सकाळी अचानक बाथरूममध्ये पडले. जेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना कळलं तेव्हा ते त्यांना उचलण्यासाठी धावले. पण प्रभू यांच्याकडून कोणतीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

लोक गोंधळले

शशी प्रभू यांना गोविंदाचा उजवा हात संबोधलं जायचं. गोविंदाच्या फिल्मी करियरमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. पण जेव्हा गोविंदाच्या सेक्रेटरीचा मृत्यू झाल्याचं कळलं तेव्हा लोकांना शशी सिन्हा यांचाच मृत्यू झाला की काय असं वाटलं. लोक गोंधळून गेले होते. पण नंतर शशी सिन्हा यांनी स्वत: सर्व गोष्टी क्लिअर केल्या. नाम साधर्म्यामुळे हा गोंधळ झाल्याचं त्यांनी सांगितलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चिल्लर कोरटकर, सोलापूरकर कुणाच्या आशीर्वादाने बाहेर फिरतायेत? राऊतांचा खणखणीत चौकार, भैय्याजींचं मराठीवरील वक्तव्य लिटमस टेस्ट? विचारला जाब चिल्लर कोरटकर, सोलापूरकर कुणाच्या आशीर्वादाने बाहेर फिरतायेत? राऊतांचा खणखणीत चौकार, भैय्याजींचं मराठीवरील वक्तव्य लिटमस टेस्ट? विचारला जाब
खासदार संजय राऊत यांनी आज राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणाचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. चिल्लर प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर हे कुणाच्या...
मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे पाकिस्तानी कार्ड, पण अमेरिकेन कोर्टाने दिला झटका
10 वर्षांतील विक्रमी गुंतवणूक केवळ 9 महिन्यात! देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची थोपटली पाठ
‘मी जिवंत आहे…’, गोविंदाचे सेक्रेटरी शशी सिन्हा यांच्या मृत्यूची बातमी खोटी, अंत्यसंस्काराचा VIDEO व्हायरल
मुंबईत 12 वर्षीय मुलीवरील सामूहिक बलात्कार, संतापलेला अभिनेता म्हणातो, ‘कायद्याचा धाक राहिलेला नाही…’
Facial- गरोदरपणात ब्लिचिंग किंवा फेशियल करणे हितावह आहे का? जाणून घ्या
एलोन मस्कच्या SpaceX चं पुन्हा अपयश; Starship फुटलं, अवकाशात दिसले भयंकर आगीचे गोळे