गुजरातमधील बोट अपघातात पाच खलाशांचा मृत्यू; पालघरच्या चौघांचा समावेश
गुजरातमधील खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटीचा अपघात होऊन पाच खलाशांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. यातील चार खलाशी पालघरच्या तलासरीमधील झाई गावातील रहिवासी असून एकजण गुजरातमधील आहे. मासेमारी करून परतत असताना त्यांच्या बोटीचा अपघात झाला आहे. दरम्यान बोटीतील दोन जखमी खालाशांना बाहेर काढण्यात बचाव दलाला यश मिळाले आहे. या अपघातामुळे झाई गावात शोककळा पसरली आहे.
अपघातग्रस्त बोट ही गुजरातमधील चुनीलाल बारिया यांच्या मालकीचे आहे. अक्षय वाघात, अमित सुरुम, सूरज वळवी, सूर्या शिंगडा, दिलीप सोळंखी, अनिल वांगड, जलाराम वळवी अशी सातजण चुन्नीलाल यांच्या निराली बोटीवर मच्छीमार म्हणून काम करत होते. हे सर्व जण १८ फेब्रुवारी रोजी बोट घेऊन मच्छीमारीसाठी खोल समुद्रात गेले होते. मच्छीमारी करून परतत असताना ४ मार्च रोजी त्यांच्या बोटीचा अपघात झाला. या अपघातात झाई गावातील अक्षय, अमित, सूरज, सूर्या आणि गुजरातमधील दिलीप या पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. तर अनिल आणि जलाराम हे दोघेही जखमी झाले असून त्यांना बाहेर काढण्यात बचाव दलाला यश आल्याची माहिती घोलवड पोलिसांनी दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List