वाल्मीक कराडला जेलमध्ये मटण, व्हीआयपी ट्रिटमेंट; सुरेश धस यांचा मोठा दावा
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येप्रकरणी संशयित आणि खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मीक कराडबाबत भाजप आमदार सुरेश धस यांनी मोठा दावा केला आहे. वाल्मीक कराडला जेलमध्ये मटण दिलं जात असल्याचे सुरेश धस म्हणाले. यासंदर्भात संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांच्याकडे पुरावे असल्याचे सुरेश धस यांनी सांगितले.
जेलमध्ये वाल्मीक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कशी व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जाते, याची जवळजवळ 13 उदाहरणं धनंजय देशमुख यांनी टायमिंगसह लेखी स्वरुपात माझ्याकडे दिलेले आहेत. वाल्मीक कराडला वेळेवर चहा देणं, त्यांच्या बॅग आत जाऊन देणं, आरोपीसोबत जेलमध्ये कुठे बॅग असते का? तरी मोठ्या बॅग घेऊन जातात. कपडे बदलले जातात. आणि काही वेळा तर वाल्मीक कराडला मटण पुरवल्याचे पुरावेही धनंजय देशमुखांना सापडल्याचे सुरेश धस म्हणाले.
धनंजय देशमुख यांनी जी माहिती मिळवली आहे ती विथ टायमिंग केलेली आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रिटमेंट दिलेली आहे, त्या सगळ्यांना निलंबित करावं, अशी मागणी आम्ही करणार असल्याचे सुरेश धस यांनी सांगितले. दरम्यान, बीडच्या मस्साजोगमध्ये सुरेश धस यांना संपूर्ण गावाचा पाठिंबा आहे. धस यांच्यावर सगळ्या गावाचा विश्वास, असे मस्साजोगचे गावकरी म्हणाले. दुसरीकडे, परळीत सुरेश धस यांना धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी काळे झेंडे दाखवले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List