अविश्वास ठराव दाखल असताना उपसभापती खुर्चीत कशा? शिवसेनेचा कोंडीत पकडणारा सवाल
विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्यांकडून उपसभापतींविरोधात काल अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. मात्र, घटनापीठाच्या कोणत्याही अधिकाऱयांवर अविश्वासाचा ठराव दाखल झाला असताना अशा न्यायाधीशांना खुर्चीत बसता येत नाही. हीच पद्धत आपल्याकडे आहे का, असे असेल तर आज उपसभापती सभागृहाच्या खुर्चीत कशा, हे नैतिकतेला धरून आहे का, याबाबत नियम काय आहेत त्याचा सचिवालयाने खुलासा करावा किंवा उपसभापतींनी मार्गदर्शन करावे, असा कोंडीत पकडणारा आणि आक्षेप घेणारा सवाल शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विचारला.
विधान परिषदेचे कामकाज आज सुरू झाले त्यावेळी सकाळी उपसभापती नीलम गोऱहे या सभागृहात उपस्थित होत्या. मात्र, त्या उपसभापतीच्या खुर्चीत बसल्या नाहीत. त्याऐवजी तालिका सभापतींनी कामकाज पाहिले. मात्र, संध्याकाळी कामकाजाच्या वेळी नीलम गोऱहे या सभापतींच्या खुर्चीत बसल्या. त्याला अनिल परब यांनी आक्षेप घेतला.
सभागृहाचे कामकाज सुरू राहू द्या!
या आधीही उपसभापतींवर अविश्वासाचा ठराव पारित झाला होता. त्यावेळीही त्यांनी सभापतींच्या खुर्चीत बसून सभागृहाचे कामकाज केले आहे. आता राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे सभागृहाचे कामकाज सुरू राहू दे, अशी विनंती आमदार प्रवीण दरेकर यांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List