दूरस्थ शिक्षण केंद्रातून दुहेरी पदवी
डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रातून दुहेरी पदवीचे शिक्षण घेता येणार आहे. या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रविष्ट होऊन एकाच वेळी दोन पदव्या घेता येतील. याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजनीश कामत आणि कुलसचिव प्रा. विलास पाध्ये उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List