Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 7 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 7 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

आजचे पंचाग

तिथी – फाल्गुन शुद्ध अष्टमी
वार – शुक्रवार
नक्षत्र – मृग
योग – प्रीती
करण – बालव
राशी – मिथुन

मेष

मेष राशीला आज मानसन्माचे योग आहे. तृतीय स्थानात चंद्र असल्याने जवळचे प्रवास होण्याची शक्यता आहे. मात्र, व्यय स्थानात राहू असल्याने अनावश्यक खर्च वाढू शकतो.तसेच कामात अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मन अस्वस्थ होऊ शकते. एकादश स्थानात शनि असल्याने उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होण्याची शक्यता आहे. कोणताही शब्द देऊन त्यात अडकू नका. चंद्र आणि शनीचे चांगले पाठबळ मिळणार आहे. घरातील वातावरणही आनंदी राहणार आहे.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस धनलाभाचा आहे. मनात सकारात्मक विचार आणि उत्साह असणार आहे. द्वितीय स्थानात चंद्र असल्याने आत्मविश्वासात वाढ होणार आहे. तसेच आय स्थानात राहू असल्याने अचानक धनलाभाचे योग आहेत. प्रथम स्थानात गुरु असल्याने अनेक गोष्टी मनासारख्या घडणार आहेत. नोकरीत बदली, बढतीचे योग आहेत. प्रगतीचे मार्ग खुले होतील. पैशांची गुतंवणूक करण्यास चांगला काळ आहे. गुंतवणूक करण्याचा विचार करण्यास योग्य काळ आहे.

मिथुन

मिथुन राशीला आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. प्रथम स्थानात चंद्र असल्याने कोणतेही कार्य आत्मविश्वासाने पूर्ण कराल. दशम स्थानात राहू असल्याने सुस्ती जाणवण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रातील वातावरण कंटाळवाणे जाणवणार आहे. तसेच कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न ठेवल्यास दिवस आनंदात जाणार आहे. प्रथम स्थानातील चंद्र आणि भाग्य स्थानातील शनिमुळे अनेक गोष्टींसाठी सहकार्य मिळण्याचे योग आहेत. मात्र, व्यय स्थानातील गुरुमुळे आध्यात्मिक कार्यात आवड निर्माण होणार आहे. ध्यानधारणेमुळे मन शांत होण्यास मदत मिळणार आहे.

कर्क

कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे. व्यय स्थानात चंद्र असल्याने अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे. नवम स्थानात राहू असल्याने कामांचे योग्य नियोजन केल्यास नशिबाची साथ मिळणार आहे. मात्र, बोलण्यात संयम ठेवत वादविवाद टाळण्याची गरज आहे. अष्टम स्थानात शनी असल्याने प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. जुने रोग डोके वर काढण्याची शक्यता आहे. एकादश स्थानातील गुरुमुळे आजचा दिवस आनंदात जाणार आहे. तसेच घरातील वातावरण प्रसन्न राहणार आहे.

सिंह

सिंह राशीच्या लोकांवर अचानक धनलाभाचे योग आहेत. एकादश स्थानातील चंद्रामुळे नवे आर्थिक स्रोत खुले होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रत्येक संधीचा सकारात्मकतेने वापर करत संधीचे सोने करण्याची गरज आहे. चंद्र आणि गुरुच्या पाठबळामुळे रेंगाळलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. मात्र, अष्टम स्थानात राहू असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे. सप्तमातील शनीमुळे व्यवसायवाढीचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, व्यवसायातील भागीदार आणि सहकाऱ्यांशी वादविवाद टाळण्याची गरज आहे.

कन्या

कन्या राशीच्या लोकांचा आज कार्यक्षेत्रात प्रभाव जाणवणार आहे. कर्म स्थानात चंद्र असल्याने कार्यक्षेत्रात दबदबा निर्माण होणार आहे. भाग्य स्थानात गुरु असल्याने नशिबाची चांगलीच साथ मिळणार आहे. रेंगाळलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. सप्तम स्थानात राहू असल्याने जोडीदाराशी किंवा व्यवसायातील भागीदारांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. षष्ठ स्थानात शनी असल्याने स्पर्धापरीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच उधार उसनवारी टाळण्याची गरज आहे. तसेच रोग आणि सत्रू त्रास देण्याची शक्यता आहे.

तूळ

तूळ राशीच्या लोकांचा आज नशीबाची चांगलीच साथ मिळणार आहे. मात्र, आजच्या दिवसात दगदग वाढणार आहे. भाग्य स्थानात गुरु असल्याने अनेक सकारात्मक गोष्टी घटणार आहेत. जास्त दगदगीमुळे थकवा जाणवू शकतो. षष्ठ स्थानात राहू असल्याने गुप्तशत्रूंवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. मात्र, बुद्धीचातुर्याने त्यावर मात करता येणार आहे. पंचम स्थानात शनी असल्याने मुलांच्या संदर्भातील समस्या डोके वर काढण्याची शक्यता आहे. तसेच परदेशातून काही शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे. गुतंवणुकीसाठी योग्य प्रयत्न केल्यास पुढील काळात त्याचा फायदा होणार आहे.

वृश्चिक

वृश्चिक राशीने आज आजारपणापासून जपण्याची गरज आहे. प्रवास किंवा अतिमेहनतीची कामे टाळावीत. अष्टम स्थानात चंद्र असल्याने मनःशांती टिकवण्यासाठी संयमाने वागावे लागणार आहे. विनाकारण वादविवाद टाळावे लागतील. अष्टम स्थानातील चंद्रामुळे अचानक धनलाभ किंवा सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे.तसेच संपत्तीबाबातचे वाद मिटण्यासाठी प्रयत्न केल्यास त्याचा फायदा होणार आहे. चतुर्थ स्थानातील शनीमुळे कुटुंबीयांशी जुळवून घ्यावे लागणार आहे. संयम ठेवा आणि प्रकृतीकडे लक्ष दिल्यास आजचा दिवस समाधानाने घालवता येणार आहे.

धनु

धनु राशीच्या लोकांना आज सहकाऱ्यांची चांगली साथ मिळणार आहे. मात्र, जोडीदाराशी वादविवाद टाळावे लागणार आहेत. जोडीदाराचे म्हणणे समजून घेत त्यांच्या कलाने घेतल्यास त्यांची साथ मिळणार असल्याने अडचणीवंर मात करणे शक्य होणार आहे. सप्तम स्थानात चंद्र असल्याने व्यवसायवाढीचे योग आहेत. चतुर्थ स्थानात राहू असल्याने कुटुंबियांकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यांच्याशी सुसंवाद ठेवल्यास मतभेद टाळता येतील. तृतीय स्थानात शनी असल्याने सामाजिक क्षेत्रात मानसन्मान वाढण्याचे योग आहेत. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

मकर

मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस काहीसा कटकटीचा असणार आहे. चंद्र षष्ठ स्थानात असल्याने नको असलेली कामे करावी लागतील. कार्यक्षेत्रआतही कामाचा व्याप वाढणार आहे. मात्र, त्यामुळे पुढे चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कार्यक्षेत्रातील जुन्या सहकाऱ्यांची भेट झाल्याने मन आनंदी होईल. तृतीय स्थानातील राहूमुळे भावंडाशी वादविवाद होणार नाही, याची काळजी घ्या. द्वितीय स्थानातील शनीमुळे चांगले आर्थिक पाठबळ मिळणार आहे.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना आज शुभ वार्ता मिळण्याचे योग आहेत. मुलांबाबत शुभवार्ता समजल्याने घरात उत्साही वातावरण असणार आहे. चंद्र पंचम स्थानात गुरुसोबत असल्याने मुलांच्या प्रगतीसाठी हा चांगला काळ आहे. जवळचा प्रवास फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे. दुसऱ्या स्थानात राहू असल्याने कुटुंब,सहकारी आणि मित्रांशी जुळवून घेतल्यास त्यांचे चांगले सहकार्य मिळण्याचे योग आहेत. तसेच अचानक आर्थिक लाभाचे योग आहेत. प्रथम स्थानात शनी असल्याने नकारात्मक विचारांचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे.

मीन

मीन राशीच्या लोकांना कुटुंबासाठी आज जास्त वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. चतुर्थ स्थानात चंद्र असल्याने घरासाठी खरेदीचे योग तयार होत आहेत. मात्र, प्रथम स्थानात राहू असल्याने मनावरील दडपण दूर करत सकारात्मक विचार ठेवण्याची गरज आहे. विनाकारण राग येणे, चिडचीड होण्याची शक्यता आहे. कुटुंबीय आणि सहकाऱ्यांची मदत मिळणार आहे. आर्थिक दृष्टीनेही आजचा दिवस चांगला जाणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’, मला सर्व समाजाचं नेतृत्व करायचंय, पंकजा मुंडे यांचे वक्तव्याची राज्यभर चर्चा ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’, मला सर्व समाजाचं नेतृत्व करायचंय, पंकजा मुंडे यांचे वक्तव्याची राज्यभर चर्चा
‘एक छंद मकरंद’ या गीताने अनेकांच्या दिवसांची सुरुवात होते. हे गीत आताच आठवण्याचे कारणही तसेच आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी...
Aurangzeb Tomb : औरंगजेबाचे थडगे सरकार पाडणार? मुख्यमंत्री म्हणाले घाईने….
मुंबईकरांनो, मध्य रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक… लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
गोविंदा शेर तर पत्नी सुनीता होणार सव्वाशेर; लवकरच एका गोष्टीची घोषणा
बॉलिवूडचा ‘फ्लॉप’ हिरो, बायकोच्याच बेस्टफ्रेंडसोबत केलं लग्न, 129 कोटींचा मालक असलेल्या अभिनेत्याला ओळखलं का?
बनावट ‘शेरखान अॅप’च्या माध्यमातून घातला 71 लाखांचा गंडा
आमदार धसांच्या लाडक्या खोक्याभाईच्या घरावर धाड, शिकारीचे साहित्य सापडले