Mumbai fire news – मुंबई एअरपोर्ट जवळील फाईव्ह स्टार हॉटेलला आग, अग्निशमन दलाचे 8 बंब घटनास्थळी दाखल
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळील फाईव्ह स्टार हॉटेलला आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे सात ते आठ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट उठले असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. ही आग नक्की कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व भागातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 जवळ असलेल्या हॉटेल फेअरमाउंटला शनिवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास आग लागली. याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केली. आगीमुळे आकाशात धुराचे लोट उठले आहेत. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळील फाईव्ह स्टार हॉटेलला आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे सात ते आठ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.#mumbaifire #chatrapatishivajiinternationalairport #Maharashtra pic.twitter.com/rW9V5RJJBb
— Saamana Online (@SaamanaOnline) February 22, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List