रिझर्व्ह बँकेची सिटी बँकेवर मोठी कारवाई, 39 लाखांचा दंड बजावला
रिझर्व्ह बँकेने सिटी बँकेवर मोठी कारवाई केली आहे. कर्जासंबंधी निर्देशांचे पालन आणि क्रेडीट सूचना कंपन्यांना संबंधित माहिती देण्यास विलंब केल्याने रिझर्व्ह बँकेने सिटी बँकेला 39 लाखांचा दंड बजावला आहे. यासंबंधी रिझर्व बँकेने माहिती दिली आहे. बँकेच्या पर्यवेक्षण मूल्यांकनाच्या काळातील 31 मार्च 2023 पर्यंत वित्तीय स्थितीचे निरीक्षण केल्यानंतर ही कारवाई केल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याने पर्यवेक्षी निष्कर्ष आणि त्या संबंधी पत्र व्यवहाराच्या आधारावर सिटी बँकेला नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसमध्ये सिटी बँकेकडून स्पष्टीकरण मागितले होते. तसेच निर्देशांचे पालन न केल्याने दंडात्मक कारवाई का करू नये, असे आरबीआयने म्हटले होते.
नोटीसवर बँकेचे उत्तर आणि व्यक्तिगत सुनावणी दरम्यान तोंडी सांगितलेल्या बाबींचा विचार करून रिझर्व्ह बँकेला काही त्रृटी दिसल्या. मोठ्या कर्जांशी निर्देशांचे उल्लंघन केले. तसेच उशिराने माहिती दिली. क्रेडिट सूचना कंपन्यांच्या नाकारलेला अहवाल प्राप्त झाल्याच्या सात दिवसांच्या आत संबंधित संशोधित आकडे सिटी बँकेने अपलोड केले नाहीत, असे रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List