सरकारने ठेकेदारांची थकविली 46 हजार कोटी रुपयांची बिले, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे पुण्यात आंदोलन
राज्य शासनाने गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील कंत्राटदारांची सुमारे ४६ हजार कोटी रुपयांची बिले रखडल्यामुळे ते आर्थिक अडचणीत आले. त्यामुळे त्यांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले असून, पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग येथील मुख्य अभियंता बांधकाम विभाग यांच्या कार्यालयात चक्क डंपर आणून अभिनव पद्धतीने आंदोलन केले.
लोकसभा, विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर हजारो कोटींच्या कामांना मजुरी देण्याचा धडाका राज्य सरकारने लावला होता. त्याचे कार्यारंभआदेशही ठेकेरदारांना देण्यात आले. काही कामे पूर्ण झाली, तर काही कामे ही प्रगतिपथावर आहेत. मात्र, या कामांची एकूण ४६ हजार कोटींची बिले न मिळाल्याने ठेकेदार अडचणीत आल्याने पुणे कॉन्ट्रक्टर असोसिएशन व हॉटमिक्स असोसिएशन यांनी आंदोलन केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी न दिल्यास सर्व कामे बंद ठेवण्याची घोषणा
यावेळी कंत्राटदार संघटनेने केली आणि पोतराजापुढे साकडं घालत हे त्यांनी अभिनव आंदोलन केले. यावेळी मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांना कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या आंदोलनस्थळी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. शासनाकडे निधी मिळवण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवून जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. ठेकेदारांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार काटकर उपस्थित होते.
पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले, हॉटमिक्स कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे संजीव व्होरा, बाबा गुंजाटे, अनिल जगताप, एम. एस. पंजाबी, भालचंद्र हुलसुरे, बिपीन दंताळ, सागर ठाकर, शैलेश खैरे, विश्वास थेऊरकर, उदय साळवे, तुषार पुस्तके, अशोक ढमढेरे, राजेंद्र कांचन, कैलास इंगळे, दिग्विजय निंबाळकर व सुमारे २०० कंत्राटदार उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List