Teeth Care Tips- स्वच्छ सुंदर मोत्यांसारख्या दातांसाठी या घरगुती टिप्स ठरतील खूप परिणामकारक
दातांची स्वच्छता हा एक मुलभूत स्वच्छतेचा विषय आहे हे आपण विसरून चालणार नाही. अनेकदा आपण कपड्यांची फॅशन करतो, परंतु दातांच्या स्वच्छता मात्र दुर्लक्षित राहतो. दातांची स्वच्छता हा एका दिवसाचा विषय नाही तर, रोज दातांची निगा राखणं आणि स्वच्छता करणे हे खूप गरजेचे आहे. दातांच्या स्वच्छता हा निरोगी आरोग्याचा पाया समजला जातो. दातांची योग्य न निगा राखल्यामुळे मुखातील अनेक रोगांना सामोरे जावे लागते.
सध्याच्या घडीला उत्तम टूथपेस्ट वापरूनही अनेकांचे दात हे पिवळे पडलेले दिसतात. तुम्हालाही पिवळ्या दातांमुळे आता ओशाळल्यासारखे होत असेल तर, आता अजिबात काळजी करु नका. घरच्या घरी साधे सोपे उपाय केल्यास दातांवरील पिवळेपणा हमखास दूर करू शकता.
दातांची निगा घरच्या घरी कशी राखावी?
मोत्यासारख्या पांढर्या दातांसाठी अर्धा चमचा बेकिंग सोड्यात चिमूटभर मीठ मिसळून ब्रशने दातांचा मसाज करा.
श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी सकाळी ब्रश केल्यानंतर पांढरा व्हिनेगर सम प्रमाणात पाण्यात मिसळून गुळण्या करा.
दात किडणे टाळण्यासाठी 1-2 अक्रोडाचे दाणे ठेचून टूथपेस्ट आणि ब्रशमध्ये मिसळा. असे केल्याने दातांच्या सर्व समस्या दूर होतात.
पिकलेली स्ट्रॉबेरी मॅश करा आणि त्यात चिमूटभर बेकिंग सोडा घाला. त्यानंतर ब्रशने दात स्वच्छ करा. दात स्वच्छ करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.
संत्र्याच्या वाळलेल्या सालींसोबत तमालपत्र बारीक करून घ्या. बोटाच्या साहाय्याने याने दात स्वच्छ करा. ही घरगुती टूथपेस्ट दातांसाठी खूप फायदेशीर आहे.
दात चमकण्यासाठी मीठ मोहरीचे तेल वापरणे हा सर्वात उत्तम मार्ग आहे. यामुळे दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List