आणखी एक शाहूकालीन वास्तू आगीत खाक, कोल्हापुरातील ‘कुष्ठधाम’च्या वास्तूला आग; केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीचे गूढ कायम

आणखी एक शाहूकालीन वास्तू आगीत खाक, कोल्हापुरातील ‘कुष्ठधाम’च्या वास्तूला आग; केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीचे गूढ कायम

शेंडा पार्क येथील कुष्ठरोग निर्मूलनासाठी संस्थानकालीन उभारण्यात आलेल्या ‘कुष्ठधाम ‘च्या जुन्या इमारतीस सोमवारी पहाटे भीषण आग लागली. ‘केशवराव भोसले नाट्यगृह’ आगीत भस्मसात झाल्याच्या प्रकरणानंतरची आणखी एका शाहूकालीन ऐतिहासिक वास्तूला लागलेल्या आगीमुळे उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. गांजा ओढणाऱ्यांच्या टोळक्यामुळेच ही आग लागल्याचा प्राथमिक संशय असला, तरी जमीन लाटण्यासाठीच हे षडयंत्र रचून कोणीतरी दुष्कृत्य केल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीचे गूढ आजही कायम असताना आता या प्रकरणाचाही छडा लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

छत्रपती शाहू महाराजांच्या काळात कुष्ठरोग निर्मूलनासाठी या इमारतीला लागून असलेल्या खोल्या या घोड्यांच्या पागा म्हणून वापरल्या जात. छत्रपती राजाराम महाराजांनी या इमारतीचा परिसर व त्याला लागून 500 एकर जमीन ही कुष्ठरुग्णांच्या उपचार व पुनर्वसनासाठी दिली. त्या काळचे सिव्हिल सर्जन डॉ. सीमेन्स यांच्या प्रयत्नांनी कुष्ठरुग्णांना राहण्यासाठी काही दगडी खोल्या बांधल्या. यात 250हून अधिक कुष्ठरुग्ण राहत असत.

सन 1965 मध्ये शेंडा पार्क कुष्ठधाम हे कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे चालवायला दिल्यानंतर कुष्ठधामच्या वैभवाला घरघर लागली. कुष्ठरोग्यांची संख्या कमी झाल्यानंतर कर्मचारीही कमी करण्यात आले. परिणामी, 2006 पासून ही इमारतसुद्धा बंद अवस्थेत होती. याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. सोमवारी पहाटे लागलेल्या आगीने ही इमारत चर्चेत आली.

अग्निशमन दलाच्या बंबांनी ही आग आटोक्यात आणली असली, तरी इमारतीचा जिना, खिडक्या, लाकडी वासे जळून सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. काही महिन्यांपूर्वी याच परिसरातील विस्तीर्ण अशा गवताला आग लागल्याने शेकडो वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. आता तर या उरलेल्या शाहकालीन ऐतिहासिक वास्तूलाही आग लागल्याने यामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.

आगीच्या घटनेने मन विदीर्ण झाले – दीपक देवलापूरकर

सन 1987पासून ‘कुष्ठतंत्रज्ञ’ म्हणून नोकरी करताना येथेच राहून कुटुंबासह कुष्ठरोग निर्मूलनासाठी विविध समाजसेवकांच्या मदतीने काम केले; पण अलीकडे परिसरात वाढते गैरप्रकार मनाला रुचत नव्हते. संपूर्ण परिसर ओसाड झाला. चोर, गुंड आणि मवाल्यांच्या ताब्यात हा परिसर गेला. चोरीची तक्रार केली तरी ती दाखल करून घेण्यास पोलिसांचा नकार. तुमचे सुरक्षारक्षक नेमा, असा शहाजोग सल्ला. या सगळ्याचा शेवट हा शाहू महाराजांची ऐतिहासिक इमारत पेटण्यात झाला. आपला 46 वर्षांचा या परिसराशी संबंध असल्याने मन विदीर्ण झाल्याची प्रतिक्रिया दीपक देवलापूरकर यांनी व्यक्त केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सक्सेसमुळे कपिल शर्मा घमेंडी झालाय? शोमधील सहकलाकार स्पष्टच बोलला सक्सेसमुळे कपिल शर्मा घमेंडी झालाय? शोमधील सहकलाकार स्पष्टच बोलला
बॉलिवूडपासून ते टिव्ही मालिकांपर्यंत अनेक कलाकार हे त्यांना मिळालेल्या यशामुळे नक्कीच बदलताना दिसतात. काहीजण आपल्या त्याच अंदाजात राहतात आणि चाहत्यांची...
बापरे इतकं प्रेम, चाहतीने संजय दत्तच्या नावावर 72 कोटी केले, अन् त्याच क्षणी तिच्या मृत्यूची बातमी
TCS कडून एका रिअल इस्टेट कंपनीचे अधिग्रहण; 2,250 कोटींना झाले डील
गरज पडल्यास तानाजी सावंत यांना तुरुंगात टाका, अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
हे डबल ढोलकी सरकार, एक मंत्री शक्तिपीठ महामार्गाला विरोध करतो, तर दुसरा मंत्री यासाठी आग्रही; विजय वडेट्टीवार यांची टीका
लाडकी बहीण- महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशातही ‘लाडली बहना’ योजनेसाठीची तरतूद केली कमी
पोलिसांपासून वाचले पण मृत्यूने गाठले, अटक टाळण्यासाठी नदीत उडी घेतलेल्या जुगाऱ्यांचा बुडून मृत्यू