मुंबई उपनगर व मुंबई शहर येथे दहा दिवसीय दशावतार कार्यशाळा आयोजन

मुंबई उपनगर व मुंबई शहर येथे दहा दिवसीय दशावतार कार्यशाळा आयोजन

सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख होण्यासाठी कोकणातील प्रसिद्ध कोळी गीत नृत्य परंपरा सर्वजनास माहिती व्हावी या उद्देशाने सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व विकास खारगे, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा अप्पर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली 2025 प्रयोगसिद्ध कलांची प्रशिक्षण शिबीरे व सत्रे आयोजन करण्यात येत आहे.

किर्तन, शाहिरी, तमाशा, नाट्य व बालनाट्य या व्यतिरिक्त विधीनाट्य, खडीगंमत, दशावतार, लावणी व झाडीपट्टी या प्रयोगसिद्ध कलांचा समावेश करण्यात आला आहे. दशावतार ही महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशातील एक पारंपरिक लोकनाट्य शैली आहे, ज्यामध्ये भगवान विष्णूच्या दहा अवतारांची कथा सादर केली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, मालवण, वेंगुर्ला, कणकवली आणि गोव्यातील काही भागांमध्ये ही कला विशेषतः लोकप्रिय आहे. मुंबई स्थित कलाप्रेंमीमध्ये या कलचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण या कार्यशाळेतून देण्यात येणार आहे.

दशावतार या रामायण व महाभारत यावर आधारित विविध घटना पात्र यांच्या परिचय देणारे तसेच कला, रंगभूषा, वेशभूषा, नृत्य, महिला पात्र, शब्द फेक, ध्वनीतील चढ उत्तार, सादरीकरण शिबीर/कार्यशाळा आपल्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येत आहे. सदर कार्यशाळा दिनांक 8 मार्च ते 18 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील 20 प्रशिक्षनार्थी ची निवड होणार आहे. या कलेचे जतन व संवर्धन व्हावे य उद्देशाने शासनाचा स्तुत्य उपक्रम आपल्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येत आहे. ही प्रयोगसिद्ध कला कार्यशाळा विनामूल्य आहे. सहभागी प्रशिक्षणार्थिंना शासनाकडील प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

शिबिर संचालक – रतन जयराम परब
9702371753
पत्ता – संतोषी माता मंदिर, आनंदेय नगर, आप्पापाडा, कुरार व्हिलेज, मालाड (पूर्व ) 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सक्सेसमुळे कपिल शर्मा घमेंडी झालाय? शोमधील सहकलाकार स्पष्टच बोलला सक्सेसमुळे कपिल शर्मा घमेंडी झालाय? शोमधील सहकलाकार स्पष्टच बोलला
बॉलिवूडपासून ते टिव्ही मालिकांपर्यंत अनेक कलाकार हे त्यांना मिळालेल्या यशामुळे नक्कीच बदलताना दिसतात. काहीजण आपल्या त्याच अंदाजात राहतात आणि चाहत्यांची...
बापरे इतकं प्रेम, चाहतीने संजय दत्तच्या नावावर 72 कोटी केले, अन् त्याच क्षणी तिच्या मृत्यूची बातमी
TCS कडून एका रिअल इस्टेट कंपनीचे अधिग्रहण; 2,250 कोटींना झाले डील
गरज पडल्यास तानाजी सावंत यांना तुरुंगात टाका, अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
हे डबल ढोलकी सरकार, एक मंत्री शक्तिपीठ महामार्गाला विरोध करतो, तर दुसरा मंत्री यासाठी आग्रही; विजय वडेट्टीवार यांची टीका
लाडकी बहीण- महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशातही ‘लाडली बहना’ योजनेसाठीची तरतूद केली कमी
पोलिसांपासून वाचले पण मृत्यूने गाठले, अटक टाळण्यासाठी नदीत उडी घेतलेल्या जुगाऱ्यांचा बुडून मृत्यू