रोशनी नाडर देशातील सर्वात श्रीमंत महिला
एचसीएल ग्रुपचे संस्थापक शिव नाडर यांच्या कन्या रोशनी नाडर या जगातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. ‘ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स’च्या माहितीनुसार, रोशनी या आता 3.13 लाख कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत भारतीय बनल्या आहेत. त्यांच्यापेक्षा जास्त संपत्ती ही फक्त रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांच्याकडे आहे.
रोशनी यांच्यापूर्वी त्यांचे वडील शिव नाडर हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते, परंतु काही दिवसांपूर्वीच शिव नाडर यांनी कंपनीतील 47 टक्के हिस्सा रोशनी नाडर-मल्होत्रा यांच्याकडे हस्तांतरित केला आहे. एचसीएल टेक्नॉलॉजी ही देशातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. त्याचे मार्पेट पॅप 4.20 लाख कोटी रुपये आहे. आता त्यातील अर्ध्याहून अधिक हिस्सा शिव नाडर यांच्या मुलीकडे आहे. शिव नाडर हे एचसीएल टेक्नॉलॉजी लिमिटेड, शिव नाडर फाऊंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष एमेरिटस आहेत. शिव नाडर हे जगातील 52 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
सावित्री जिंदाल यांना मागे टाकले
रोशनी नाडर यांनी श्रीमंत महिलेच्या यादीत सावित्री जिंदाल यांना मागे टाकले आहे. सावित्री जिंदाल यांच्याकडे 2.63 लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. श्रीमंत महिलांच्या यादीत त्यांचा आता पाचवा नंबर लागतो. रोशनी या शिव नाडर फाऊंडेशनच्या विश्वस्त आहेत. व्यवसाय आणि समाजातील योगदानासाठी त्यांना फॉर्च्यून इंडियाच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत अनेक वेळा स्थान मिळाले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List