‘एक्स’वरच्या सायबर हल्ल्यामागे युक्रेनचा हात; एलॉन मस्क यांचा गंभीर आरोप
मायक्रोब्लॉगिंग साईट एक्सची सेवा सोमवारी दुपारच्या वेळी विस्कळीत झाली, परंतु यामागे युक्रेनचा हात आहे, असा गंभीर आरोप एक्सचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी मंगळवारी केला आहे. एक्सची सेवा नेमकी कशामुळे विस्कळीत झाली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
नेमके काय घडले आहे, हे माहिती नाही. परंतु एक्स सिस्टम नष्ट करण्यासाठी युक्रेनमधून सुरू झालेल्या आयपी अॅड्रेसवरून मोठा सायबर हल्ला करण्यात आला, असे मस्क यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. सोमवारी तीन वेळा एक्सची सेवा विस्कळीत झाली होती. यामुळे युजर्संना अडचणींचा सामना करावा लागला. सर्वात आधी दुपारी साडेतीनच्या सुमारास अर्धा तास सेवा डाऊन झाली. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता एका तासासाठी सर्व्हिस डाऊन होती. त्यानंतर रात्री साडेआठ ते साडेदहा वाजेपर्यंत सेवा विस्कळीत राहिली.
मस्क यांनी पोस्ट शेअर करत युक्रेनवर गंभीर आरोप केला. युक्रेनने हा सायबर हल्ला केला आहे. आपल्याला दररोज अशा हल्ल्यांचा सामना करावा लागतो, पण या वेळी ते अनेक स्रोतांनी केले आहे. या हल्ल्यात एकतर मोठा गट किंवा देश सामील आहे, असे त्यांनी म्हटले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List