इतिहास वाचा, शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोकही होते; अजितदादांनी नितेश राणेंना फटकारलं

इतिहास वाचा, शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोकही होते; अजितदादांनी नितेश राणेंना फटकारलं

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता असे विधान मत्स्य व बंदरे खात्याचे मंत्री आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले होते. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. अशा पद्धतीचे वक्तव्य महाराष्ट्राला परवडणारे नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिम लोकही होते, असे म्हणत अजित पवार यांनी नितेश राणेंना इतिहास वाचण्याचाही सल्ला दिला. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 112 व्या जयंती निमित्त कराड येथील प्रिती संगमावर अभिवादन करण्यासाठी अजित पवार पोहोचले होते. यावेळी ते बोलत होते.

अलीकडे दोन्ही बाजूचे लोक अशा पद्धतीचे वक्तव्य करतात की जे महाराष्ट्राला परवडणारे नाही. यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्यानंतर ज्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले त्यांनी जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना जाती-जातीत, समाजा-समाजात भेद केला नाही. महाराष्ट्रात राहणारा मराठा असून त्यात सर्व जाती-धर्माचे लोक आहेत. या सगळ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हे नवीन पिढीने सतत लक्षात ठेवला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

दोन्ही बाजूच्या सदस्यांनी कुठल्याही वक्तव्यामुळे कायदा-सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ज्यांना देशाबद्दल प्रेम आहे, असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आपल्या देशात, महाराष्ट्रात आहे, असेही अजित पवार म्हणाले. तसेच नितेश राणे यांच्या वक्तव्या मागचा हेतू माहिती नाही, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, इतिहास आपण वाचला आहे. अनेक मोठ्या लोकांनी पुस्तकं लिहिली आहेत, इतिहासाचे संशोधन केले आहे. इतिहासाची माहिती खोलवर जाऊन मिळवली आहे. या सगळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर जे लोक होते, त्यात मुस्लिम लोक सुद्ध होते. दारुगोळा कोण सांभाळत होते? अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला देतायेतील. त्यामुळे त्यांनी असे वक्तव्य का केले आणि त्यामागे त्यांचा हेतू काय हे माहिती नाही. परंतु आपल्या देशाबाबत अभिमान बाळगणारे मुस्लिम घटक आहेत, ते देशप्रेमीच आहेत, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

सत्तेचा माज बरा नव्हे मंत्रीसाहेब! पुण्यात बॅनर लावून नितेश राणेंना टोला, मुख्यमंत्र्यांनाही धरले धारेवर

टिल्ल्या लोकांची उंची आणि झेप किती

दरम्यान, अजित पवार आणि नितेश राणे यांच्यामध्ये पूर्वीपासूनच वितुष्ट आहे. याआधी महाविकास आघाडीचे सरकार असताना नितेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी अजित पवार यांनी नितेश राणे यांच्या उंचीची खिल्ली उडवत त्यांना टिल्ल्या असे म्हटले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सक्सेसमुळे कपिल शर्मा घमेंडी झालाय? शोमधील सहकलाकार स्पष्टच बोलला सक्सेसमुळे कपिल शर्मा घमेंडी झालाय? शोमधील सहकलाकार स्पष्टच बोलला
बॉलिवूडपासून ते टिव्ही मालिकांपर्यंत अनेक कलाकार हे त्यांना मिळालेल्या यशामुळे नक्कीच बदलताना दिसतात. काहीजण आपल्या त्याच अंदाजात राहतात आणि चाहत्यांची...
बापरे इतकं प्रेम, चाहतीने संजय दत्तच्या नावावर 72 कोटी केले, अन् त्याच क्षणी तिच्या मृत्यूची बातमी
TCS कडून एका रिअल इस्टेट कंपनीचे अधिग्रहण; 2,250 कोटींना झाले डील
गरज पडल्यास तानाजी सावंत यांना तुरुंगात टाका, अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
हे डबल ढोलकी सरकार, एक मंत्री शक्तिपीठ महामार्गाला विरोध करतो, तर दुसरा मंत्री यासाठी आग्रही; विजय वडेट्टीवार यांची टीका
लाडकी बहीण- महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशातही ‘लाडली बहना’ योजनेसाठीची तरतूद केली कमी
पोलिसांपासून वाचले पण मृत्यूने गाठले, अटक टाळण्यासाठी नदीत उडी घेतलेल्या जुगाऱ्यांचा बुडून मृत्यू