पुणे हादरले; उपचारांच्या नावाखाली गैरवर्तन
स्वारगेट येथे ‘शिवशाही’ बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा पुण्यात महिलेसोबत गैरवर्तन घडल्याचा प्रकार समोर आला आहे.
धनकवडी येथील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात काम करणाऱ्या महिलेला आरोपीने कपडे काढायला लावल्याचे समोर आले आहे. ‘मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. मी सांगतो तसे तू उपचार केले नाहीस, तर तुझे आयुर्वेदिक केंद्र बंद करून टाकेन,’ अशी धमकी देत जबरदस्ती उपचार करून घेतले. दरम्यान, त्याच्यासोबत असलेल्या मित्राने उपचार सुरू असतानाच गुपचूप व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर आरोपीने आपल्या साथीदारांसह दुकानात घुसून महिलेची आर्थिक लूट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपींनी शहरातील सात ते आठ ठिकाणी अशा प्रकारे गुन्हे केल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे.
रोहित गुरुदत्त वाघमारे (वय 29, रा. वारजे माळवाडी), शुभम चांगदेव धनवटे (वय 202, रा. उत्तमनगर), राहुल ज्ञानेश्वर वाघमारे (वय 36, रा. कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी वाघमारे हा ३ मार्च रोजी आयुर्वेदिक मसाज पार्लरमध्ये गेला. आरोपींनी एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याची बतावणी करून महिलेशी अश्लील वर्तन केले. मसाज करताना व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. त्यानंतर आरोपींनी गल्ल्यातील 800 रुपयांची रोकड लुटून नेली. पोलिसांनी तांत्रिक तपास केला. तपासात आरोपी वारजे माळवाडी भागात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिघांना सापळा लावून पकडले. परिमंडळ-२च्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, गुन्हे निरीक्षक सुरेखा चव्हाण, सहायक निरीक्षक सागर पाटील, बापू खुटवड, अंमलदार अमोल पवार, बजरंग पवार, महेश मंडलिक, सागर सुतकर, किरण कांबळे, आदींसह पथकाने ही कारवाई केली
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List