शेख हसीना यांना मोठा धक्का, दोन बंगले व कुटुंबीयांची बँक खाती जप्त
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या धनमोंडी येथील घरावर तसेच सुदासधन बंगला आणि नातेवाईकांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश ढाका न्यायालयाने दिले आहेत. त्यासोबतच त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित 124 खाती देखील जप्त करण्यात आली आहेत. ढाका न्यायालयाचे विशेष न्यायमूर्ती झाकीर होसेन गालिब यांनी हे आदेश दिले आहेत.
शेख हसीन यांचे दिवंगत पती व बांगलादेशचे शास्त्रज्ञ वाझेद मिआ यांच्या नावावर असलेल्या सुदासदन हा बंगला देखील जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या व्यतिरिक्त त्यांची मुलगी सायमा वाझेद पुतुल, मुलगा साजिब वाझेद जॉय, बहिण शेख रेहाना आणि तिच्या मुली ट्युलिप सिद्दीकी आणि रदवान मुजिब सिद्दीकी यांची बँक खाती जप्त करण्यात आली आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List