सुनीता विल्यम्स लवकरच पृथ्वीवर परतणार; नासाचे अंतराळयान आज झेपावणार
सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर या दोघांना परत पृथ्वीवर आणण्यासाठी नासाचे एक अंतराळयान उद्या, 12 मार्च रोजी आकाशात झेपावणार आहे. हे अंतराळयान बुधवारी नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून उड्डाण करणार आहे.
सुनीता आणि त्यांचे सहकारी 5 जून 2024 पासून अंतराळात अडकलेले आहेत. क्रू-10 मध्ये नासाच्या अंतराळवीर अॅन मॅक्क्लेन आणि निकोल आयर्स यांच्यासह जपानी अंतराळ संस्थेतील दोन अंतराळवीरांचा समावेश आहे. याआधी नासाचे अंतराळवीर निक हेग आणि अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांना स्पेसएक्स क्रू-9 मोहिमेवर आयएसएसमध्ये पाठवण्यात आले, ज्यामध्ये अडकलेल्या अंतराळवीरांसाठी दोन जागा राखीव ठेवण्यात आल्या. पण तेही मिशन अयशस्वी झाले. आता चारही अंतराळवीर 16 मार्च रोजी एकत्र पृथ्वीवर परत येतील.
अनेक विक्रम नावावर
सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्यांनी सर्व मिशनदरम्यान 62 तास 9 मिनिटे स्पेसवॉक केला आहे. तसेच 150 हून अधिक युनिक सायंटिफिक एक्सपेरिमेंट आणि टेक्नोलॉजी टेमोन्सट्रेशनवर काम केले. ज्यामध्ये 900 तासांहून अधिक संशोधन केले. स्वतःला फीट ठेवण्यासाठी सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्टेशनवर वेट ट्रेनिंगसुद्धा घेतली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List