New India Cooperative Bank Scam – हितेश मेहताची लाय डिटेक्टर चाचणी
न्यू इंडिया बँकेतील 122 कोटींच्या अपहारतील मुख्य आरोपी आणि बँकेचा माजी जनरल मॅनेजर हितेश मेहता याची मंगळवारी लाय डिटेक्टर चाचणी घेण्यात आली. या चाचणीचा तपशील समजू शकला नाही. मेहता आपल्या जबाबात दिशाभूल करत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी ही चाचणी करण्याची मागणी केली होती.
आरबीआयच्या पथकाने 12 फेब्रुवारीला बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव येथील तिजोऱ्यांची तपासणी केली तेव्हा बँकेतील 122 कोटींची रोकड कमी आढळून आली होती. त्यावेळी मीच 122 कोटी रुपयांचा अपहार केल्याचे बँकेचा माजी जनरल मॅनेजर असलेल्या मेहताने कबूल केले. त्याच्या जबाबावरून पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन याला अटक केली. पौन याला 70 कोटी तर सोलार पॅनलचा व्यावसायिक अरुणचलम याला 40 कोटी दिल्याचे मेहताचे म्हणणे आहे. पौन याच्या उलटतपासणीत मेहता देत असलेल्या माहितीत विसंगती आढळून आल्याने ही चाचणी करण्यात आली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List