अश्लील सीनचा भडीमार, पण…! ‘हे’ सिनेमे बदलणार तुमचे विचार; कोणते आहेत पिक्चर?
बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमे आहेत जे प्रदर्शित होऊन अनेक वर्ष उलटली असली तरी देखील आजही त्यांची चर्चा आहे. यामध्ये बॉलिवूडमधील काही अश्लील सीनचा भडीमार असलेल्या सिनेमांचा देखील समावेश आहे. या चित्रपटात अश्लील सीन्स असले तरी देखील कथा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी आहे. तसेच चित्रपटातून देण्यात आलेला सामाजिक संदेश देखील प्रेक्षकांना प्रभावित करताना दिसला. तुम्हाला असे सिनेमे पाहायचे असतील तर चला जाणून घेऊया या सिनेमांविषयी…
आम्ही ज्या सिनेमांविषयी बोलत आहोत ते १८ वर्षांवरील प्रेक्षक केवळ पाहून शकतात. कारण या चित्रपटांमधील विषय हे अतिशय खोल आणि गुंतागुंतीचे आहेत. त्यासोबतच चित्रपटांमध्ये काही अश्लील दृश्ये दाखवण्यात आली आहेत. तसेच हे चित्रपट पाहिल्यानंतर तुमचे विचार नक्की बदलतील…
बुलबुल
‘बुलबुल’ हा एक हॉरर सिनेमा आहे. हा सिनेमा २०२०मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात एक व्यक्ती बऱ्याच वर्षांनंतर घरी परत असल्याचे दाखवण्यात आले आहे. घरी परतल्यानंतर त्याला कळते की त्याच्या वहिनीचे वागणे पूर्ण बदलले आहे. तिला भावाने सोडून दिले आहे. तसेच गावात होणाऱ्या काही रहस्यमयी मृत्यूंविषयीची माहिती त्याला सापडते. चित्रपटाची कथा केवळ भीती आणि थ्रिल निर्माण करत नाही तर एक समाजिक संदेश देखील देते.
काम सूत्र: अ टेल ऑफ लव्ह
हा सिनेमा १९९६ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा विषय थोडा वेगळा आहे. चित्रपटात तारा नावाच्या राजकुमारीची कथा दाखवण्यात आली आहे. ताराकडे माया नावाची नोकराणी असते. ही माया ताराचे आयुष्य गुंतागुंतीचे बनवत असते. माया ताराच्या होणाऱ्या नवऱ्याला तिच्याविषयी भडकवत असते. त्यामुळे नात्यांची गुंतागुंत आणि भावनिक वळण सिनेमात पाहायला मिळते. या चित्रपटात अनेक अश्लील सीन दाखवण्यात आले आहेत. पण नात्यांमधील गुंतागुंत प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते.
पार्च्ड
‘पार्च्ड’ या चित्रपटात पुराणमतवादी समाज आणि महिलांची बिकट परिस्थिती दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाची कथा ही तीन महिलांच्या भोवती फिरताना दिसते. एक महिला विधवा आहे, दुसरी महिला वेश्या आहे तर तिसऱ्या महिलेला मुलबाळ नाही. या तीन महिलांवर समाज कशाप्रकारे अन्याय करतो हे दाखवण्यात आले आहे.
अज्जी
या सिनेमात एका वृद्ध महिलेची कथा दाखवण्यात आली आहे. ही वृद्ध महिला आपल्या पतीसोबत राहात असते. दोघेही त्यांच्या नातीवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्याचा प्रयत्न करत असतात. जेव्हा न्याय व्यवस्था तुम्हाला न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरते तेव्हा तुमची लढाई तुम्ही स्वत: लढली पाहिजे असा संदेश चित्रपटाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.
बालक पालक
या चित्रपटात चार किशोरवयीन मुलांची कथा दाखवण्यात आली आहे. ही मुले त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलांविषयी जाणून घेण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. हा एक कॉमेडी ड्रामा आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List