‘रात्री फक्त 2 तासांसाठी गर्लफ्रेंडची गरज…’, अभिनेत्याचा डेटिंग लाईफविषयी खळबळजनक खुलासा

‘रात्री फक्त 2 तासांसाठी गर्लफ्रेंडची गरज…’, अभिनेत्याचा डेटिंग लाईफविषयी खळबळजनक खुलासा

Samarth Jurel on Dating: ‘बिग बॉस १७’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता म्हणजे समर्थ जुरेल. तो त्याच्या बिनधास्त आणि मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखला जातो. आज समर्थला कोणत्याही वेगळ्या ओळखची गरज नाही. पण सध्या समर्थ हा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. त्याने नुकताच एका मुलाखतीमध्ये ‘रात्री फक्त २ तासांसाठी गर्लफ्रेंडची गरज वाटते’ असे खळबळजनक वक्तव्य करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

बिग बॉसच्या घरात असतानाच समर्थ जुरेल आणि ईशा मालविश यांच्या नात्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यांनी बिग बॉसच्या घरात प्रेमाची कबुली देत आधीपासूनच एकमेकांना डेट करत असल्याचे सांगिते होते. पण शो संपल्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाल्याचे समोर आले होते. ईशा मालविशसोबत ब्रेकअप झाल्यानंतर समर्थ कोणालाही डेट करत नाही. या सगळ्या गोष्टींसाठी त्याच्याकडे वेळ नसल्याचे समर्थने नुकताच सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Paras Chhabra (@_abraakadabrashow)

समर्थने पारस छाबडाच्या पॉडकास्टमध्ये नुकतीच हजेरी लावली. या पॉडकास्टमध्ये त्याने खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींवर वक्तव्य केले. त्याने सांगितले की, ईशानंतर त्याने कोणालाही डेट केलेले नाही. ‘माझ्याकडे या गोष्टींसाठी अजिबात वेळ नाही आणि मी सध्या कामात व्यग्र आहे. रिलेशनशीपमध्ये येण्यासाठी मला वेळच मिळाला नाही. मला कामात व्यस्त राहणे आवडत आहे’ असे समर्थ म्हणाला. पण समर्थच्या या वक्तव्यावर पारसचा विश्वासच बसत नव्हता.

या पॉडकास्टमध्ये समर्थने सांगितले की केवळ दोन तासांसाठी कोणीतरी गर्लफ्रेंड असावी असे त्याला सतत वाटते. ‘मला एखाद्या मुलीला गर्लफ्रेंड बनवण्याची इच्छा होते. रात्री केवळ दोन तासांसाठी गर्लफ्रेंड असावी असे वाटते’ असे समर्थ म्हणाला. ते ऐकून पारस छाबडाला धक्का बसला. त्यानंतर समर्थने स्वत:ची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्याने पुढे म्हटले की, ‘जेव्हा मी रात्री पार्टीसाठी जातो तेव्हा इतर मित्रांच्या गर्लफ्रेंड त्यांच्यासोबत असतात. ते पाहून माझी देखील गर्लफ्रेंड असावी असे वाटते.’

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

धनंजय मुंडे यांचा राजीनामा होताच देवगिरी बंगल्यावर बैठक, अजितदादा गटाचे बडे नेते पोहोचले; मोठ्या घडामोडींना वेग धनंजय मुंडे यांचा राजीनामा होताच देवगिरी बंगल्यावर बैठक, अजितदादा गटाचे बडे नेते पोहोचले; मोठ्या घडामोडींना वेग
मोठी बातमी समोर येत आहे, आज अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे...
फरहानची गोव्यात दंबगगिरी, आता ‘वॉन्टेंड गर्ल’ आयशा टाकियाची वादात उडी, थेट असे केले आरोप
पाकिस्तानी लष्करी कम्पाउंडमध्ये आत्मघातकी हल्ला; स्फोटकांच्या गाड्यांचा घडवला अपघात, 6 जणांचा मृत्यू
Champions Trophy 2025- टीम इंडियाची अंतिम फेरीत धडक; कांगारुंचा 4 गडी राखत पराभव
Hybrid इंजिन, ADAS आणि 360-डिग्री कॅमेरा फीचर्स; Volvo XC90 लॉन्च, जाणून घ्या किंमत
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा 90 दिवसांच्या आत निकाल लावा, अखिल भारतीय सरपंच परिषदेचा इशारा
रिफायनरीच्या मुद्द्यावरुन भाजप आणि मिंधे गटात संघर्ष होणार; विषय संपला म्हणणारा मिंधे गट तोंडावर आपटला