11 वर्षांत 65 पैकी केवळ 8 इमारतींचा ताबा, आरक्षित भूखंडावरील बिल्डिंगचा ताबा घेण्यास पालिकेची उदासीनता
मुंबई शहर आणि उपनगरांतील काही आरक्षित भूखंडांवर म्हाडा व एसआरएने बांधलेल्या 65 इमारती पालिकेला शाळांसाठी हस्तांतरित केल्या जाणार आहेत. मागील 6 ते 11 वर्षांत यातील फक्त सात ते आठ इमारती ताब्यात मिळाल्या असून त्यात शाळाही सुरू झाल्या आहेत. मात्र परवानग्या व इतर कारणांमुळे उर्वरित इमारतींचा ताबा रखडलाय. एकीकडे पालिका शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे मुलांचा कल वाढत असताना तेथे शाळांच्या इमारती उपलब्ध नसल्याने मुलांची गैरसोय होते. त्यामुळे वर्गखोल्यांची गरज असताना उपलब्ध असलेल्या इमारतींचा ताबा घेण्याकडे पालिकेची प्रक्रिया धिम्या गतीने सुरू आहे.
शहर, पूर्व उपनगर व पश्चिम उपनगर परिसरात एकूण 65 इमारती बांधून तयार आहेत. यातील शहरात 18, पूर्व उपनगरात 26 आणि पश्चिम उपनगरात 21 इमारती आहेत. तीन ते सात मजली असलेल्या या इमारतींच्या सर्व मजल्यांवर पालिकेच्या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. मागील वर्षापर्यंत यातील आठ इमारतींचा ताबा पालिकेला मिळाला असून त्यात वर्गही सुरू झाले आहेत. इतर इमारतींचा ताबा मिळण्यात परवानग्या व इतर कारणांनी अडथळे येत आहेत. सध्या शाळांची पटसंख्या वाढत असल्याने इमारतींची आवश्यकता भासणार आहे. या पार्श्वभूमीवर उर्वरित इमारतींचा ताबा घेण्याची प्रक्रियाही सुरू आहे. आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर या सर्व इमारती पालिकेच्या ताब्यात येतील, असे संबंधित विभागाच्या एका अधिकाऱयाने सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List