नाद केला अन् जिवानिशी गेला; हायस्पीड ड्रायव्हिंगसह स्नॅपचॅटवर चॅटिंग करणे 2 जीवलग मित्रांच्या जीवावर बेतलं

नाद केला अन् जिवानिशी गेला; हायस्पीड ड्रायव्हिंगसह स्नॅपचॅटवर चॅटिंग करणे 2 जीवलग मित्रांच्या जीवावर बेतलं

गाडी चालवताना फोनवर बोलू नका, मोबाईलवर चॅटिंग करू नका अशा सूचना रस्त्याच्या कडेला फलकावर लावलेल्या असतात. मात्र आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग अपघात होतो. असाच प्रकार मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील कोलार भागात घडला आहे. वेगाने कार चालवताना स्नॅपचॅटवर चॅटिंग करणारे दोन जणांच्या जीवावर बेतले आहे. चॅटिंग करताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट 50 फूट खोल नदीत कोसळले. यात दोन जीवलग मित्रांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पलाश गायकवाड (वय – 25), विनीत (वय – 22) आणि पीयूष गजभिये (वय – 24) हे तिने मित्र कारने फिरण्यासाठी बाहेर गेले होते. विनीत ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. वेगाने गाडी चालवत असताना तो स्नॅपचॅटवर चॅटिंगही करत होता.

गाडीचा वेग जास्त होता आणि कोलार सिक्स लेनवरील इनायतपूरजवळ केरवा नदीवरील पुलासमोर अचानक वळण आल्याने विनीतचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट खोल नदीत कोसळली. गाडी नदीत पडताच दरवाजे जाम झाले. त्यामुळे विनीत आणि पलाश बाहेर पडू शकले नाहीत, अशी माहिती जखमी पीयूषने दिली.

पीयूषने गाडीची काच फोडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. अपघाताची माहिती मिळताच पुलावर लोकांनी गर्दी केली होती. त्यापैकीच काहींनी पीयूषला मदत केली आणि त्याला वाचवले.

5 वर्षाचा चिमुरडा चुकून बसमध्ये चढला; आजीची घालमेल, पालकांच्या काळजाचा ठोका चुकला अन्…

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विनीत आणि पलाश या दोघांचे मृतदेह गाडीतून बाहेर काढले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी हमीदिया रुग्णालयात पाठवण्यात आले. तर या घटनेत जखमी झालेल्या पीयूषवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ चुकांमुळे तुमच्या केसांची वाढ मंदावते, तज्ज्ञ उपाय जाणून घ्या ‘या’ चुकांमुळे तुमच्या केसांची वाढ मंदावते, तज्ज्ञ उपाय जाणून घ्या
केसांची वाढ योग्य पद्धतीने होणे हा अनेकांचा महत्वाचा विषय आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात चुकीच्या खानपानामुळे आरोग्याबरोबरच केसांवर देखील त्याचे वाईट...
आता लाल परिसाठी नो वेटिंग…, गर्दीलाही टाटा बाय- बाय, परिवहन मंत्र्यांचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय
पोलिसांच्या 35 टीम सैफच्या हल्लेखोराला मुंबईभर शोधत होत्या, तो मात्र फक्त शर्ट बदलून पोलीस ठाण्याबाहेरच भटकत होता
‘धरतीपुत्र नंदिनी’ फेम अमन जैस्वाल यांचा वयाच्या 22 वर्षी अपघातात मृत्यू
Garlic: तुपात शिजवून नियमित खा लसूण, मग पाहा चमत्कारीक फायदे
प्रसिद्ध अभिनेता अमन जैस्वालचे अपघाती निधन, जोगेश्वरी पुलावर बाईकला ट्रकने उडवले
छत्रपती संभाजीनगरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार, अपघातातील मृतांचे दागिने चोरले