Saif Ali Khan attack – रक्तबंबाळ असूनही सैफ मुलाला घेऊन चालत हॉस्पिटलमध्ये आला…; डॉक्टरांनी दिली त्याच्या तब्येतीची मोठी अपडेट
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या प्रकृतीबाबत आजची अपडेट लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली. न्युरोसर्जन डॉ. नितीन डांगे आणि लीलावती हॉस्पिटलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर निरज उट्टमणी यांनी माध्यमांना माहिती दिली. सैफ अली खानच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सैफची प्रकृती आता उत्तम आहे. त्याला आज आम्ही चालावला लावलं. तो व्यवस्थित चालत आहे. त्याला फारश्या वेदना होत नाहीयेत आणि इतर कुठलीही लक्षणं त्याच्यात दिसून आली नाहीत. त्याच्या जखमा आणि इतर महत्त्वाच्या बाबी पाहता त्याला आता ICU मधून स्पेशल रूममध्ये शिफ्ट करण्यात येणार आहे, असे डॉ. नितीन डांगे यांनी सांगितले.
पाठीवर झालेल्या गंभीर जखमेमुळे इन्फेक्शन होण्याचा धोका आहे. त्यामुळे सैफने काही काळासाठी कामापासून विश्रांती घ्यावी. तसेच त्याला जवळपास आठवडाभरासाठी बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. मणक्याला झालेल्या गंभीर इजेमुळे त्यातून स्त्राव होत होता. आता हा स्त्राव बंद होऊन सुधारणा होत आहे. पण पुन्हा इन्फेकन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सैफ लवकर बरा व्हावा यासाठी त्याला भेटण्यासाठी येणाऱ्यांवर मनाई करण्यात आली आहे. सैफच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे, असे डॉ. डांगे म्हणाले.
#WATCH | Saif Ali Khan Attack Case | Niraj Uttamani, Chief Operating Officer of Lilavati Hospital says, “Saif Ali Khan is a real hero…He is doing well. He has been shifted from ICU to a normal room…” pic.twitter.com/3pucBkC8ys
— ANI (@ANI) January 17, 2025
‘रक्तबंबाळ असूनही सैफ सिंहासारखा चालत आला, तेही मुलाला घेऊन’
सैफ अली खान हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा त्यांना भेटणारा मी पहिला डॉक्टर होतो. सैफ त्यावेळी रक्तबंबाळ झालेला होता. पण तो आपला मुलगा तैमूरसोबत एका सिंहासारखा चालत हॉस्पिटलमध्ये आला. त्यामुळे सैफ हा खरा हिरो आहे. सध्या सैफची प्रकृती चांगली आहे. त्याल आयसीयूमधून शिफ्ट करण्यात येत आहे. त्याला भेटण्यास मर्यादा घालण्यात आल्या आहेत, असे डॉ. निरज उट्टमणी यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List