टय़ुशनसाठी आलेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार
टय़ुशनसाठी आलेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना डोंबिवलीत घडली आहे. विशेष म्हणजे आरोपी हा शिक्षिकेचा भाऊ असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. वैभव सिंग असे या नराधमाचे नाव असून त्याला आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पीडित मुलगी ही डोंबिवलीत राहणारी असून ती सिंग यांच्या घरी नेहमी टय़ुशनला जायची. 15 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता ही मुलगी नेहमीप्रमाणे टय़ुशनला गेली होती. मात्र त्या वेळी टिचर घरी नव्हती. त्याचा फायदा घेऊन आरोपी वैभव सिंग याने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. पीडितेने घरी गेल्यानंतर आपल्या आई-वडिलांना ही घटना सांगितली. पालकांनी तातडीने मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. त्यानंतर वैभव याला अटक करण्यात आली.
विवाहितेवर अत्याचार
डोंबिवली – दिरानेच वहिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कल्याणच्या जोशीबाग परिसरात घडली आहे. तसेच पतीही मोबाईलवर अश्लील व्हिडीओ बघून पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करत होता. पती आणि दिराच्या अत्याचाराला कंटाळून पीडित महिलेने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पती, दीर, सासू आणि नणंदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List