Mahakumbh Mela 2025 – पाप लागेल तुम्हाला…, साध्वी हर्षा रिछारियाला रडू कोसळलं; कुंभमेळा सोडणार
उत्तर प्रदेशात प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यातील फोटो आणि व्हिडिओमुळे सोशल मीडियावर हर्षा रिछारिया ही चर्चेत आली. आता हर्षा रिछारियाने महाकुंभ मेळा सोडण्याची घोषणा केली आहे. महाकुंभच्या सुरुवातीला अमृत स्नान सोहळ्यात हर्षाचा समावेश केल्याने आणि महामंडलेश्वरच्या शाही रथात बसल्याने विरोध झाला होता.
शाकुंभरी पीठाधीश्वर आणि काली सेना प्रमुख स्वामी आनंद स्वरुप यांनी हर्षाच्या समावेशाला विरोध करत हे धर्मविरोधी असल्याचे म्हटले होते. आता हर्षाने स्वतः महाकुंभमधून परतणार असल्याचे जाहीर केले आहे. सनातन धर्म समजण्याची माझी इच्छा होती. पण काही लोकांनी माझ्यावर टीका केली आणि हे पाप त्यांना नक्कीच भरावं लागेल, असे सांगत हर्षा भावूक झाली आणि तीला रडू कोसळलं.
तुम्हाला लाज वाटली पाहिजे, एक मुलगी धर्माशी जुळण्यासाठी आली होती, धर्म समजण्यासाठी आली होती, सनातन संस्कृती जाणण्यासाठी आली होती. पण महाकुंभ मेळा संपेपर्यंत तुम्ही तिला थांबण्या लायकही ठेवले नाही. हा महाकुंभ आयुष्यात एकदाच येतो तोही तुम्ही हिसकावून घेतला. पुण्य माहिती नाही पण जे आनंद स्वरुपजी आहेत… त्यांना नक्की पाप लागेल, असा संताप तिने व्यक्त केला.
लोक आता मला टार्गेट करत आहेत. त्यामुळे जिथून आली होती, परत तिथे जाईल. संपूर्ण महाकुंभ मेळ्यासाठी आले होते. पण आता मी इथे थांबू शकत नाही. सनातन धर्माचा प्रचार करण्यासाठी आणि समजण्यासाठी आले होते. पण सगळे आपल्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. यामुळे मला ठेच पोहोचली आहे, असे हर्षा रिछारिया म्हणाली.
साध्वी सुंदर असल्याने त्याची चर्चा होत आहे. साध्वी हर्षा याआधी अँकर म्हणून काम करत होत्या. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी बँकॉकमध्ये एका डेस्टिनेशन वेडिंग शो केला होता. हर्षा रिछारिया या इन्स्टाग्रामवरसुद्धा ऑक्टिव असतात. या अकाऊंटवरून त्यांनी साध्वी आयुष्याचे पह्टो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List