महाराष्ट्र सरकार, ऊर्जा विभाग सर्वोच्च न्यायालयाचं ऐकणार नाही का? मुनगंटीवारांचा खरमरीत सवाल

महाराष्ट्र सरकार, ऊर्जा विभाग सर्वोच्च न्यायालयाचं ऐकणार नाही का? मुनगंटीवारांचा खरमरीत सवाल

भाजपचे चंद्रपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरवासीयांच्या प्रश्नांवरून आज स्वत:च्या सरकारला आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या ऊर्जा विभागाला लक्ष्य केले आहे. चंद्रपूरच्या जनतेने वीज निर्मितीसाठी सहकार्य करायचे आणि सरकारने आम्हाला माती खायला लावायची, असे चालणार नाही, असा खरमरीत इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे काय? महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयाचेही मानणार नाही? ऊर्जा विभाग सर्वोच्च न्यायालयाचं ऐकणार नाही? असे सवाल देखील त्यांनी यावेळी केले.

चंद्रपूर शहराला लागून असलेल्या दुर्गापूर गावातून वीज केंद्राला ‘रोप वे’ च्या माध्यमातून कोळसा पुरवला जातो. हा ‘रोप वे’ चाळीस वर्षे जुना आहे. त्यामुळे कोळशाची धूळ आणि आवाज याचा त्रास येथील लोकांना सहन करावा लागत आहे. स्थानिकांनी यासंदर्भात मुनगंटीवार यांना वारंवार तक्रारी केल्यानंतर आज त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. दुर्गापूरमधील रोप वे आणि ध्वनी प्रदूषणाची स्थिती अनुभवली. त्यांनी लगेच वीज केंद्राच्या वरिष्ठांशी बोलून समस्या मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. मात्र हे करताना त्यांनी आपल्या सरकारला आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे असलेल्या ऊर्जा विभागाला इशारा दिला. ‘आम्ही 112 वाघांचे सहाशे वाघ करू शकतो, तर वाघाचा पंजा पण मारू शकतो’, अशा शब्दात त्यांनी सरकारला ठणकावलं.

सर्वोच्च न्यायालयानं आवाजाची विशिष्ट मर्यादा आखून दिली आहे. यासाठी गणेशोत्सवात आम्ही डीजे वर बंदी घालतो. मग डीजे वाजत नाही तर सीएसपी वाजेल का? मग त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे काय? महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयाचेही मानणार नाही? ऊर्जा विभाग सर्वोच्च न्यायालयाचं ऐकणार नाही? हे तर संविधान लागू होण्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे त्यामुळे सर्वांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावीच लागेल.

– सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते, आमदार

या प्रश्नासंदर्भात बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, ‘या यंत्रणा आता टाकाऊ झाल्या आहेत. सीटीपीएसचे जे सीजीएम आहे त्यांना आता मी विचारणा केली की किती वर्ष झाली या यंत्रणेला तर चाळीस वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तर आताचा कालावधी हा नवीन यंत्रणा वापरण्याचा कालावधी आहे’. नवीन यंत्रणा बसवून सीएचपी प्लांट आमचे अधिकारी चांगले करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ चुकांमुळे तुमच्या केसांची वाढ मंदावते, तज्ज्ञ उपाय जाणून घ्या ‘या’ चुकांमुळे तुमच्या केसांची वाढ मंदावते, तज्ज्ञ उपाय जाणून घ्या
केसांची वाढ योग्य पद्धतीने होणे हा अनेकांचा महत्वाचा विषय आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात चुकीच्या खानपानामुळे आरोग्याबरोबरच केसांवर देखील त्याचे वाईट...
आता लाल परिसाठी नो वेटिंग…, गर्दीलाही टाटा बाय- बाय, परिवहन मंत्र्यांचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय
पोलिसांच्या 35 टीम सैफच्या हल्लेखोराला मुंबईभर शोधत होत्या, तो मात्र फक्त शर्ट बदलून पोलीस ठाण्याबाहेरच भटकत होता
‘धरतीपुत्र नंदिनी’ फेम अमन जैस्वाल यांचा वयाच्या 22 वर्षी अपघातात मृत्यू
Garlic: तुपात शिजवून नियमित खा लसूण, मग पाहा चमत्कारीक फायदे
प्रसिद्ध अभिनेता अमन जैस्वालचे अपघाती निधन, जोगेश्वरी पुलावर बाईकला ट्रकने उडवले
छत्रपती संभाजीनगरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार, अपघातातील मृतांचे दागिने चोरले