स्नेहसंमेलनाची वर्गणी न देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून रोखले, अखेर पालकांच्या संतापामुळे प्राचार्य नमले

स्नेहसंमेलनाची वर्गणी न देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून रोखले, अखेर पालकांच्या संतापामुळे प्राचार्य नमले

शिक्षण विभाग आणि इतर विभागांतील प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुरी फॅक्टरी येथील एका इंग्रजी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शाळा व्यवस्थापनाने या स्नेहसंमेलनाच्या खर्चाचा भार विद्यार्थ्यांवर टाकण्यात आला. स्नेहसंमेलनाची वर्गणी ज्या विद्यार्थ्यांनी जमा केली नाही, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नाही. प्राचार्यांनी परीक्षेदिवशी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दरम्यान, याबाबत पालकांनी प्राचार्यांना धारेवर धरल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवेश देण्यात आला.

शाळेत नुकत्याच झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी विद्यार्थ्यांकडून ठराविक रक्कम जमा करण्याचे आदेश शाळा व्यवस्थापनाने दिले होते. ज्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात भाग घेतला, त्यांनी वर्गणीरुपाने इंग्रजी शाळेचे ठराविक रक्कम शाळेकडे जमा केली. परंतु, ज्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात भाग घेतला नाही, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी वर्गणी देण्यास नकार दिला. शाळा व्यवस्थापन मंडळाने ज्या विद्याथ्यर्थ्यांनी वर्गणी दिली नाही, त्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी वर्गखोलीस प्रवेश नाकारून त्यांना वर्गाबाहेर बसवले. याबाबत पालकांना समजताच, त्यांनी शाळेत येऊन प्राचार्यांना चांगलेच धारेवर धरले.

आम्ही वर्षभर विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरतो, त्यामुळे स्नेहसंमेलनात भाग न घेता, ती वर्गणी आम्ही का द्यायची, असा सवाल केला. काही पालकांनी वार्षिक स्नेहसंमेलनाची वर्गणी भरतो; पण आम्हाला त्याची पावती द्या. विद्यार्थ्यांना परीक्षेपासूनच वंचित ठेवून बाहेर बसवून ठेवू नका, अशी विनंती केली. मात्र, प्राचार्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत स्नेहसंमेलनाची फी भराल तरच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसून देईन, असा पवित्रा घेतला. त्यामुळे वातावरण अधिकच तापले. यावेळी राहुरी फॅक्टरी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेने विद्यार्थ्यांचे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन घेतले. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. आलेल्या अधिकाऱ्यांचा मानसन्मान महागाडी भेटवस्तू देऊन करण्यात आला. मात्र, हा खर्च शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांकडून वार्षिक स्नेहसंमेलन वर्गणीरुपाने वसूल करण्याचे चुकीचे काम केले आहे.

पालकांच्या असंतोषामुळे प्रार्चायांनी अखेरीस विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवण्याची परवानगी दिली; परंतु वर्गणी घेणारच, असेही सांगितले. दरम्यान, काही पालकांनी प्राचार्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

ही शाळा विविध कारणांस्तव कायमच प्रसिद्धीच्या झोतात असते. मागील वर्षी शाळेत एका धर्माचा व जातीच्या विद्यार्थ्यांचा अनादर केला म्हणून उपप्राचार्यावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाहेडा यांनी संबंधित उपप्राचार्यास अटक केली होती.

तक्रारींकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

राहुरी फॅक्टरी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेबाबत अनेक तक्रारी कायम येत असतात. कधी विद्यार्थ्यांना त्रास, कधी पालकांची आर्थिक पिळवणूक, तर कधी कर्मचाऱ्यांचे शोषण केले जाते. याबाबत पालकांनी व कर्मचाऱ्यांनी शिक्षण विभागाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याकडे राहुरी पंचायत समितीचा शिक्षण विभाग दुर्लक्ष करत आहे. या तक्रारींवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे पालकांनी सांगितले.
– अरविंद दूस, पालक

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ चुकांमुळे तुमच्या केसांची वाढ मंदावते, तज्ज्ञ उपाय जाणून घ्या ‘या’ चुकांमुळे तुमच्या केसांची वाढ मंदावते, तज्ज्ञ उपाय जाणून घ्या
केसांची वाढ योग्य पद्धतीने होणे हा अनेकांचा महत्वाचा विषय आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात चुकीच्या खानपानामुळे आरोग्याबरोबरच केसांवर देखील त्याचे वाईट...
आता लाल परिसाठी नो वेटिंग…, गर्दीलाही टाटा बाय- बाय, परिवहन मंत्र्यांचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय
पोलिसांच्या 35 टीम सैफच्या हल्लेखोराला मुंबईभर शोधत होत्या, तो मात्र फक्त शर्ट बदलून पोलीस ठाण्याबाहेरच भटकत होता
‘धरतीपुत्र नंदिनी’ फेम अमन जैस्वाल यांचा वयाच्या 22 वर्षी अपघातात मृत्यू
Garlic: तुपात शिजवून नियमित खा लसूण, मग पाहा चमत्कारीक फायदे
प्रसिद्ध अभिनेता अमन जैस्वालचे अपघाती निधन, जोगेश्वरी पुलावर बाईकला ट्रकने उडवले
छत्रपती संभाजीनगरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार, अपघातातील मृतांचे दागिने चोरले