परदेशातील नोकरी सोडून आधुनिक शेतीची कास
अलीकडच्या काळात अनेक तरुण शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. बिहारमधील गया येथील युवा शेतकरी प्रभात कुमारने शेतीचा प्रयोग यशस्वी करून कोटय़वधी कमावले आहेत. प्रभात कुमार असे या शेतकऱयाचे नाव आहे. मशरूमच्या शेतीतून तो वर्षाला दोन कोटींची उलाढाल करत आहे.
बिहारमधील गया जिह्यातील टिकारीच्या बडगाव गावात राहणारा प्रभात कुमार पूर्वी इंजिनीअर होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रभात कुमारला परदेशात नोकरी मिळाली होती. इंजिनीअरिंगची नोकरी सोडून त्याने शेती क्षेत्रात पाऊल ठेवले.
सुरुवातीला प्रभात कुमारने मशरूमची शेती करण्याचा निर्णय घेतला. पूर्वी लोकांना मशरूमबद्दल माहिती नव्हती. गेल्या दहा वर्षांपासून त्याची मागणी वाढली आहे. प्रभातने 2016-17 मध्ये मशरूमची लागवड केली. प्रभातने सुमारे 450 गावांतील 25 ते 28 हजार शेतकऱयांना पारंपरिक कृषी पद्धतीतून बाहेर काढले आणि नवीन कृषी तंत्राची ओळख करून दिली. त्याने मशरूम उत्पादनासाङ्गी प्रोसेसिंग प्लांट उभारला असून त्यात अनेक लोक काम करतात. येथे दररोज दहा हजार किलो मशरूमचे उत्पादन होते. प्रशिक्षणासाठी त्यांनी समर्थ नावाची संस्था काढली आणि लोकांशी जोडण्यास सुरुवात केली. शेतजमीन नसली तरी अगदी लहान खोलीतही मशरूमचे उत्पादन घेता येते. त्याच्या मशरूम प्रोसेसिंग प्लांटमध्ये अनेक लोक काम करतात. दररोज दहा हजार किलो मशरूमचे उत्पादन होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List