Rashmika Mandanna: 2025 मधील बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या यादीत रश्मिकाची बाजी, सर्वाधिक तीन चित्रपटांचा समावेश
‘पुष्पा’ आणि ‘पुष्पा-2’ चित्रपटातून सामे सामे म्हणत प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणारी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाकडे आता बिग बॅनरची आणि जबरदस्त भूमिका असलेली कामे मोठ्या प्रमाणात आहेत. विशेष म्हणजे रश्मिका मंदानाकडे 2025 मध्ये रिलिज होणारे तीन असे चित्रपट आहेत जे 2025 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या यादीत आहेत. IMDb ने नुकतीच 2025 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये रश्मिका मंदानाचे तीन चित्रपट आहेत.
जगभरातून IMDb वर दर महिन्याला विझिटर्स भेट देत असतात. त्यावर अॅनालिटिक्सवरून ही यादी ठरवण्यात येते. रश्मिका मंदान्ना तीन प्रमुख भूमिकांमधील चित्रपटांसह IMDb च्या यादीत समाविष्ट होणारी एकमेव अभिनेत्री ठरली आहे. ए.आर. मुरुगदॉस यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट ‘सिकंदर’ हा ऍक्शन ड्रामा IMDb यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. ज्यात रश्मिका अभिनेता सलमान खानसोबत झळकणार आहे. तर ऐतिहासिक ड्रामा ‘छावा’ मध्ये देखील रश्मिका ही अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. तर यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या थामा या बहुप्रतीक्षित हॉरर-कॉमेडी चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुरानासोबतही रश्मिका झळकणार आहे. हा दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.
यासंदर्भात रश्मिका म्हणते की, ‘माझे 3 आगामी चित्रपट IMDb च्या 2025 मधील सर्वाधिक बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या यादीत पाहून मला खूप छान वाटतंय. 2024 चा शेवट पुष्पा 2 च्या जबरदस्त प्रतिसादाने झाला आणि 2025 ची सुरुवात तीन आगामी चित्रपटांच्या यादीत समावेशासह झाली ही बाब माझ्यासाठी खूप आनंद देणारी आहे. चित्रपटांमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्या मनाला भावणारं काम करण्याचं माझं नेहमीच स्वप्न राहिलं आहे आणि हाच विचार मला अधिक मेहनत करण्याची प्रेरणा देतो. माझ्या चाहत्यांचे आणि या चित्रपटांच्या टीममधील प्रत्येकाचे मी मनःपूर्वक आभार मानते, ज्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं’.
2025 चे IMDb चे सर्वाधिक बहुप्रतीक्षित हिंदुस्थानी चित्रपट:
1. सिकंदर
2. टॉक्सिक
3. कूली
4. हाऊसफुल 5
5. बाग़ी 4
6. राजा साब
7. वॉर 2
8. L2: एंपुरान
9. देवा
10. छावा
11. कन्नप्पा
12. रेट्रो
13. ठग लाईफ
14. जाट
15. स्काय फोर्स
16. सितारे जमीन पर
17. थामा
18. कंतारा ए लीजंड: चॅपटर 1
19. अल्फा
20. थांडेल
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List