“पत्नीची दारू पिण्याची सवय ही क्रूरता ठरत नाही, जोपर्यंत ती नशेत…”, उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

“पत्नीची दारू पिण्याची सवय ही क्रूरता ठरत नाही, जोपर्यंत ती नशेत…”, उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

पत्नीची दारू पिण्याची सवय ही पतीशी क्रूरता ठरत नाही. जोपर्यंत ती दारू पिऊन नशेत पतीशी अभद्र किंवा गैरवर्तन करत नाही, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने पती-पत्नीच्या घटस्फोटाशी संबंधित एका प्रकरणात केले आहे.

काय आहे प्रकरण?

पत्नी दारू पिते आणि काहीही न कळवता रात्री मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवते, असा दावा करत पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. यावर न्यायालयाने म्हटले की, जोपर्यंत दारू पिऊन अयोग्य वर्तन करत नाही तोपर्यंत दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही.

याचिकार्त्याने घटस्फोटाची मागणी करणाऱ्या अर्जात पत्नी क्रूर वागत असून आपल्याला सोडून गेल्याचे म्हटले होते. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती विवेक चौधरी आणि न्यायमूर्ती ओमप्रकाश शुक्ला यांच्या खंडपीठासमोर झाली. त्यावेळी न्यायालयाने क्रूरता आणि त्याग या दोन्ही भिन्न गोष्टी असल्याचे म्हटले.

न्यायालयात ही बाब कुठेही सिद्ध झालेली नाही की दारू पिणे ही क्रूरता आहे किंवा दारू पिल्याच्या कारणास्तव जन्मलेल्या मुलांमध्ये शारिरीक व्यग आहे किंवा प्रकृती स्थास्थ ठीक नाही. याशिवाय पत्नीला आलेले फोन कॉल हे पुरुष मित्रांचेच आहेत याचाही कुठला पुरावा नाही. ज्याद्वारे पत्नी क्रूरपणे वागली हे सिद्ध होईल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

दरम्यान, याचिकाकर्ता पतीने 2015 मध्ये मेट्रोमेनियल साईटवरून ओळख झालेल्या महिलेची लग्न केले होते. मात्र 2016 मध्ये लहान मुलाला घेऊन पत्नीने घर सोडले आणि ती माहेरी रहायला गेली. तेव्हापासून दोघेही विभक्त राहत होते. याच आधारे न्यायालयाने दोघांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ चुकांमुळे तुमच्या केसांची वाढ मंदावते, तज्ज्ञ उपाय जाणून घ्या ‘या’ चुकांमुळे तुमच्या केसांची वाढ मंदावते, तज्ज्ञ उपाय जाणून घ्या
केसांची वाढ योग्य पद्धतीने होणे हा अनेकांचा महत्वाचा विषय आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात चुकीच्या खानपानामुळे आरोग्याबरोबरच केसांवर देखील त्याचे वाईट...
आता लाल परिसाठी नो वेटिंग…, गर्दीलाही टाटा बाय- बाय, परिवहन मंत्र्यांचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय
पोलिसांच्या 35 टीम सैफच्या हल्लेखोराला मुंबईभर शोधत होत्या, तो मात्र फक्त शर्ट बदलून पोलीस ठाण्याबाहेरच भटकत होता
‘धरतीपुत्र नंदिनी’ फेम अमन जैस्वाल यांचा वयाच्या 22 वर्षी अपघातात मृत्यू
Garlic: तुपात शिजवून नियमित खा लसूण, मग पाहा चमत्कारीक फायदे
प्रसिद्ध अभिनेता अमन जैस्वालचे अपघाती निधन, जोगेश्वरी पुलावर बाईकला ट्रकने उडवले
छत्रपती संभाजीनगरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार, अपघातातील मृतांचे दागिने चोरले