नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गोळीबाराच्या घटनांनी युरोप हादरले; मॉन्टेनिग्रोमधील बारमध्ये अंदाधुंद गोळीबार, बार मालक आणि 2 मुलांसह 12 जणांचा मृत्यू

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गोळीबाराच्या घटनांनी युरोप हादरले; मॉन्टेनिग्रोमधील बारमध्ये अंदाधुंद गोळीबार, बार मालक आणि 2 मुलांसह 12 जणांचा मृत्यू

अमेरिकेतील लुईझियाना येथील न्यू ऑर्लिन्स शहरात बोर्बेन रोडवर नववर्षाचा जल्लोष सुरू असताना दहशतवादी हल्ला झाला. गर्दीत ट्रक घुसवून 15 जणांना चिरडले. ही घटना ताजी असतानाच आज युरोपातील मॉन्टेनिग्रोमधील सेंटिजे शहरात नववर्षाचा जल्लोष सुरू असतानाच एका व्यक्तीने बारमध्ये अंदाधुंद गोळीबार करून त्याच्याच कुटुंबातील सदस्य तसेच बार मालक आणि त्याच्या दोन मुलांसह 12 जणांना ठार मारले. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले. हल्लेखोराने नंतर घटनास्थळावरून पळ काढला, मात्र पोलिसांनी त्याला गाठून घेरले. त्यावेळी त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

अशा प्रकारे गोळीबाराची गेल्या तीन वर्षांतील ही तिसरी घटना असल्याचे समोर आले आहे. अॅको मार्टीनोव्हीक (45) असे हल्लेखोराचे नाव आहे. मार्टिनोव्हीक त्याचे कुटुंब आणि पाहुण्यांसह बारमध्ये उपस्थित होता. या घटनेची सुरुवात बारमधील हाणामारीने झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हाणामारीनंतर मार्टिनोव्हीक घरी गेला आणि शस्त्र घेऊन परत आला. त्यानंतर त्याने स्थानिक प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बारमध्येच अंदाधुंद गोळीबार केला. बारमध्येच त्याने चार लोकांचा बळी घेतला होता. त्यानंतर तब्बल सहा ठिकाणी जाऊन त्याने गोळीबार केला आणि इतर लोकांचा जीव घेतला. दरम्यान, काwटुंबिक कलहातून ही घटना घडली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

  • या घटनेनंतर शस्त्र बाळगण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याचा विचार सरकार करत आहे, असे पंतप्रधान मिलोज्को स्पॅजिक यांनी सांगितले.
  • मॉन्टेनिग्रो हा युरोपातील लहानसा देश असून या देशाची लोकसंख्या अवघी 6 लाख 20 हजार आहे. या देशात जवळपास सर्वांकडेच शस्त्रs आहेत.

पंतप्रधानांनी जाहीर केला राष्ट्रीय दुखवटा

या हल्ल्यानंतर सरकारने गुरुवारपासून तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. मॉन्टेनिग्रोचे पंतप्रधान मिलोज्को स्पॅजिक यांनी गोळीबाराची घटना म्हणजे भयंकर शोकांतिका असल्याचे म्हटले आहे. हल्ल्यात जखमी झालेल्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, पोलिसांनी सांगितल्यानुसार हल्लेखोर मार्टिनोविकचा गुन्हेगारी रेकॉर्ड होता. बेकायदेशीर शस्त्रs बाळगल्याबद्दल त्याला शिक्षाही झाली होती. त्याविरोधात त्याने न्यायालयात अपीलही केले होते.

न्यूयॉर्कमधील नाईट क्लबमध्ये गोळीबार; 11 जखमी

अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील क्वीन्स शहरात बुधवारी रात्री उशिरा नवनवर्षाचा जल्लोष सुरू असताना एका नाईट क्लबच्या बाहेर गोळीबार झाला. चार जणांनी 30 राऊंड गोळय़ा झाडल्या. या गोळीबारात सुमारे 11 तरुण जखमी झाले. हल्लेखोराने 12 वर्षांची मुलगी आणि तिच्या आईचा ढाल म्हणून वापर केला. गोळीबारानंतर ते सर्वजण पळून गेले. हल्लेखोरांबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गोळीबारात मुलगी आणि आई दोघेही जखमी झाले. गेल्या 24 तासांत अमेरिकेत गोळीबाराची ही दुसरी घटना आहे.

गर्दीत ट्रक घुसवणारा इसिस प्रेरित

अमेरिकेतील न्यू ऑर्लियन्स येथे नववर्षाचा जल्लोष सुरू असताना गर्दीत ट्रक घुसवून 15 जणांना चिरडण्यात आले तर 30 जण जखमी झाले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हल्लेखोराचा मृत्यू झाला. शमसुद-दिन जब्बार असे या हल्लेखोराचे नाव असून तो इसिसने प्रेरित होता अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तपास करताना पोलिसांना बंदुका आणि इतर उपकरणांसहित एक सुधारित स्पह्टक यंत्रही सापडले. तसेच वाहनावर इसिसचा झेंडाही सापडला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले की, एफबीआयला हल्लेखोराशी संबंधित व्हिडीओ सापडले आहेत. त्यात त्याने तो इस्लामिक स्टेटकडून प्रेरित असल्याचे म्हटले आहे. व्हिडीओत त्याने इसिसमध्ये सामील होण्याच्या स्वप्नांचा उल्लेख केला आहे. दरम्यान, सेलिब्रेशनच्या नावाखाली कुटुंबाला मारण्याचा डावही त्याने आखला होता, परंतु नंतर त्याने इसिसमध्ये सामील होण्यासाठी हा डाव रद्द केला.

जब्बार लष्करात होता

न्यू ऑर्लियन्समध्ये गर्दीत ट्रक घुसवणारा जब्बार मार्च 2007 ते जानेवारी 2015 पर्यंत लष्करात होता. त्यानंतर जानेवारी 2015 ते जुलै 2020 पर्यंत आर्मी रिझर्व्हमध्ये होता. फेब्रुवारी 2009 ते जानेवारी 2010 पर्यंत त्याला अफगाणिस्तानात तैनात केले होते आणि स्टाफ सार्जंट पदावरून तो शेवटी निवृत्त झाला. सध्या तो रिअल इस्टेट क्षेत्रात काम करत होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

PM मोदी आज 38 मिनिटे बोलले, त्यातले 29 मिनिटे त्यांनी दिल्लीतील जनतेला शिव्या दिल्या – अरविंद केजरीवाल PM मोदी आज 38 मिनिटे बोलले, त्यातले 29 मिनिटे त्यांनी दिल्लीतील जनतेला शिव्या दिल्या – अरविंद केजरीवाल
पंतप्रधान दिल्लीच्या जनतेला दररोज शिवीगाळ करत आहेत, दिल्लीच्या जनतेचा अपमान करत आहेत, दिल्लीची जनता भाजपला या अपमानाचे उत्तर निवडणुकीत देईल,...
Eknath Shinde Threat: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल
मुंबईकरांना मिळणार सर्वत्र मेट्रो प्रवासाचा आनंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड गाणं; महेश बाबूच्या बायकोचा बाथरूममधील ‘तो’ सीन पाहाताच वाटते लाज, लोक बदलतात चॅनल
स्वतंत्र हिंदुस्थानात RBI ने सर्वातआधी जारी केली होती ‘ही’ नोट, जाणून घ्या नोटेवर कोणाचा छापण्यात आला होता फोटो
Affordable Maruti Brezza – मारुती ब्रेझाची किंमत होऊ शकते कमी, लहान इंजिनसह येईल नवीन मॉडेल
टीव्ही मालिका पाहून तांत्रिकाने दोघांचा काटा काढला, पण तिसऱ्याला संपवण्याच्या तयारीत असतानाच पर्दाफाश