‘डुंईंग नथिंग’चा नवा ट्रेंड, काहीही काम न करता वर्षाला कमावतोय 69 लाख
काहीही काम न करता वर्षाला लाखो रुपये कमावता येतात… खरं वाटत नाही ना…पण असा एक अवलिया जगात आहे. ‘काहीही न करणारा’ अशी ओळख असलेला आणि वर्षाला 69 लाख रुपये कमाई करणारा व्यक्ती म्हणजे जपानचा शोजी मोरिमोटो. 41 वर्षीय मोरिमोटो त्याच्या अनोख्या ओळखीमुळे जगात चर्चेत आलाय. तो केवळ आपल्या उपस्थितीने लोकांना मनःशांती देऊन एवढी बक्कळ कमाई करतो. शोजी मोरिमोटो आपल्या ‘डुंईंग नथिंग’ सेवेतून बरेच काही करतोय असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. तो फक्त लोकांसोबत वेळ घालवतो. सुरुवातीला शोजी आपल्या सर्व्हिसप्रमाणे पैसे आकारचा. मात्र 2024 सालापासून त्याने ‘पे अँड युज विश मॉडेल’ आणले. त्यामध्ये ग्राहक स्वतः ठरवतात त्यांना किती रक्कम द्यायचीय. एखाद्या व्यक्तीच्या एकटेपणाच्या काळात त्याच्यासोबत राहणे, मानसिक आधार देणे अशी सर्व्हिस तो पुरवतो.
– आयुष्यातील अनुभवांवरून शोजी मोरिनोटो याने हा पेशा स्वीकारलाय. डुईंग नथिंग ही केवळ सर्व्हिस नाही तर जीवन जगण्याची एक पद्धत आहे, असे तो मानतो.
– फक्त एखाद्या व्यक्तीसोबत शांतपणे बसायचे. त्याच्यासोबत फक्त उपस्थिती दर्शवायची. यातूनही कुणाच्या तरी आयुष्यात खूप मोठा बदल घडू शकतो. विशेषतः जे लोक एकटेपणा, मानसिक अशांती अशा कठीण काळातून जात आहेत. हा पैसे कमावण्याचा मार्ग नसून स्वतःसाठी अनुभव आहे, असे शोजी सांगतो.
– शोजी मोरिमोटोची सर्व्हिस म्हणजे जपानमध्ये एक ट्रेंड बनला आहे. कोणत्याही भावनिक गुंतवणुकीशिवाय आयुष्याच्या कठीण काळात एखाद्या व्यक्तीची केवळ उपस्थिती कित्येक लोकांना हवी आहे.
– कोणताही सल्ला वगैरे द्यायच्या भानगडीत शोजी पडत नाही. कोणतीही भावनिक गुंतवणूक नाही. फक्त आपली उपस्थिती लावतो. गेल्या वर्षभरात एक हजार लोकांनी त्याला संपर्क साधला होता. या लोकांना फक्त शांतपणे शोजीची उपस्थिती हवी होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List