स्टीव्ह जॉब्सची पत्नी महाकुंभला भेट देणार
13 जानेवारीपासून सुरू होणारा महाकुंभ मेळा पाहण्यासाठी आणि हिंदू धर्माचा अभ्यास करण्यासाठी अॅपल कंपनीचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल या महाकुंभला भेट देणार आहेत. 25 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या लॉरेन या पौष पौर्णिमेच्या दिवशी संगम नदीत स्नान करणार आहेत. त्यांची व्यवस्था निरंजनी आखाडय़ाचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलासनंद यांच्या शिबिरात करण्यात आली आहे. त्या 19 जानेवारीला महाकुंभला पोहोचणार असून 29 जानेवारीपर्यंत शिबिरात राहून हिंदू धर्म समजून घेतील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List