Thane crime news – तोतया आयकर आयुक्ताने बेरोजगारांचे दोन कोटी लुटले, बनावट ओळखपत्रे, बोगस नियुक्तीपत्रेही दिली

Thane crime news – तोतया आयकर आयुक्ताने बेरोजगारांचे दोन कोटी लुटले, बनावट ओळखपत्रे, बोगस नियुक्तीपत्रेही दिली

आयकर विभागात आयकर निरीक्षक म्हणून नोकरीला लावून देतो असे सांगत एका सुशिक्षित बेरोजगार तरुणीकडून 15 लाख रुपये उकळणाऱ्या तोतया आयकर आयुक्ताच्या मुसक्या वसई पोलिसांनी नवी मुंबईतून आवळल्या. या तोतयाने त्या तरुणीला आयकर विभागाचे बनावट ओळखपत्र आणि नियुक्तीपत्र दिल्याने हा भंडाफोड झाला. या तोतया आयकर अधिकाऱ्याजवळ तब्बल 28 मोठ्या सरकारी हुद्द्याची बोगस आयडेंटिटी कार्ड, शिक्के सापडले असून त्याने 40 हून अधिक तरुणांची फसवणूक करून दोन कोटींहून अधिक रक्कम उकळल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. रिंकू शर्मा असे या तोतया आयकर अधिकाऱ्याचे नाव आहे.

वसईतील एका तरुणीला आयकर विभागात आयकर निरीक्षक या पदावर नोकरी लावण्याचे आश्वासन आरोपी रिंकू शर्मा याने दिले. मी आयकर आयुक्त आहे असे सांगत हा तोतया आयकर विभागाचा लोगो असलेले दिव्याचे वाहन वापरत असे. आयकर विभागात नोकरी लावण्यासाठी 15 लाख रुपये खर्च येईल असे त्याने एका तरुणीच्या पालकांना सांगितले. त्याचा रुबाब पाहून त्यांनी रिंकू शर्माला 15 लाख रुपये दिले. त्यानंतर रिंकू शर्माने त्या तरुणीचे बोगस आयकर ओळखपत्र आणि बनावट नियुक्तीपत्रही दिले, परंतु आयकर विभागात रुजू होण्यासाठी गेलेल्या त्या तरुणीला आपण फसवले गेल्याचे कळल्यानंतर त्यांनी पेल्हार पोलीस ठाण्यात धाव घेऊन रिंकू शर्माविरोधात तक्रार दाखल केली.

मीरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, उपायुक्त गुन्हे अविनाश अंबुरे, सहाय्यक आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, उपनिरीक्षक उमेश भागवत तसेच सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी रिंकू शर्माला अटक केली.

पत्नीला गळा दाबून मारले, पांघरुणात गुंडाळून बाथरूममध्ये फेकले, दोन टोलनाक्यांवर चकवा; आणेवाडी टोलनाक्यावर खुनी पती जेरबंद

मोठ्या हुद्द्याची खोटी ओळखपत्रे आणि शिक्के सापडले

या प्रकरणाचा तपास विरारच्या गुन्हे शाखा कक्ष क्रमांक 3 च्या टीमने सुरू केला, तेव्हा त्यांना रिंकू शर्मा हा नवी मुंबईत असल्याचे कळले. त्यांनी सापळा रचून रिंकूवर झडप घातली तेव्हा त्याच्याकडे आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त, आयकर निरीक्षक, गृह विभागाचे सहाय्यक आयुक्त, सीबीआयचे आयुक्त अशी खोटी ओळखपत्रे सापडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘राजकारणात उद्या काय होईल ते सांगता येईल का?’; उद्धव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य?  ‘राजकारणात उद्या काय होईल ते सांगता येईल का?’; उद्धव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य? 
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं कामकाज कुठपर्यंत झालं हे पाहण्यासाठी...
शिवसेनाप्रमुखांनी आत्मचरित्र का लिहिले नाही…उद्धव ठाकरे यांनी दिले उत्तर
गौरी खानचं खरं नाव माहितीये का? गौरीनेलग्नावेळी शाहरूखचंही बदललं होतं नाव
वामिका-अकायसोबत विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाला; मागितली ‘ही’ गोष्ट
कोल्ड ड्रिंक्स प्यायल्याने कॅन्सर होतो का? जाणून घ्या
पाकला घेरलं; तालिबानचा सैन्याच्या चौक्यांवर हल्ला, अणु प्रकल्पातील 16 कामगारांचं अपहरण
मराठमोळ्या सायलीचे पदार्पण आणि टीम इंडियाची विजयी सुरुवात, आयर्लंडचा केला 6 विकेटने पराभव