पत्नीला गळा दाबून मारले, पांघरुणात गुंडाळून बाथरूममध्ये फेकले, दोन टोलनाक्यांवर चकवा; आणेवाडी टोलनाक्यावर खुनी पती जेरबंद

पत्नीला गळा दाबून मारले, पांघरुणात गुंडाळून बाथरूममध्ये फेकले, दोन टोलनाक्यांवर चकवा; आणेवाडी टोलनाक्यावर खुनी पती जेरबंद

किरकोळ कौटुंबिक कारणातून पत्नीची गळा दाबून हत्या करणाऱ्या नराधम पतीला खालापूर पोलिसांनी फिल्मीस्टाईल पद्धतीने पाठलाग करून अटक केली आहे. गणेश घोडके असे त्याचे नाव आहे. पत्नीचा मृतदेह पांघरुणात गुंडाळून तो नंतर बाथरूममध्ये फेकून कारने फरार झालेला गणेश दोन टोलनाक्यांवर चकवा देऊन सटकला. मात्र सातारच्या आणेवाडी टोलनाक्यावर त्याच्यावर खालापूर पोलिसांनी झडप घातली.

मूळचा बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील घाळशीळ येथील गणेश घोडके गेल्या पाच महिन्यांपासून खोपोलीजवळील लौजी- चिंचवली शेकीन येथील सुखकर्ता अपार्टमेंटमध्ये पत्नीस राहत होता. त्याचे किरकोळ कारणांवरून पत्नीसोबत भांडण झाल आणि त्याने पत्नी शीतल हिच ओढणीने गळा आवळून तिची हत्य केली. त्यानंतर तिचा मृतदेह पांघरुणान गुंडाळून तो बाथरूममध्ये ठेवला जाताना त्याने मित्र अशुतोष देशमुख याला घडलेला प्रकार मोबाईलवरून कळवला.

नंबरप्लेटवरून तपासाची चक्रे फिरवली

अशुतोषने दिलेल्या तक्रारीवरून खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कदम, पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी गणेशच्या कारच्या नंबरप्लेटवरून तपासाची चक्रे फिरवली. त्यावेळी गणेशची कार उर्से टोलनाका ओलांडून गेल्याचे कळले. खोपोली पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. सातारच्या दिशेने जाणाऱ्या गणेशने खेड शिवापूर टोलनाक्यावरही पोलिसांना चकवा दिला. मात्र पोलिसांनी सातारा आणेवाडी टोलनाक्यावर आधीच फिल्डिंग लावली आणि तिथे गणेशला जेरबंद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बॉलिवूडच्या बड्या हस्तीचं निधन, पण नीना गुप्तांचा श्रद्धांजलीस नकार; म्हणाल्या, त्याने माझ्या… बॉलिवूडच्या बड्या हस्तीचं निधन, पण नीना गुप्तांचा श्रद्धांजलीस नकार; म्हणाल्या, त्याने माझ्या…
विख्यात दिग्दर्शक प्रीतीश नंदी यांचे नुकतेच निधन झाले. बुधवारी 8 जानेवारी) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूडमधील अनेकजण...
गौरी नवरा शाहरुख खानचे सर्व चित्रपट फ्लॉप होण्याची देवाकडे सतत प्रार्थना का करायची?
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत 22 वर्षांपासून लिव्ह इनमध्ये; अभिनेता म्हणाला ‘लग्न वैगरे…’
तुमचेही काजळ लावल्यानंतर पसरते का? मग ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स
Weightloss Tips: लठ्ठपणामुळे त्रस्त आहात? जेवल्यानंतर ‘या’ गोष्टी करणं टाळा अन्यथा…
हृदयाच्या आरोग्यासाठी कॉफी प्यायची योग्य वेळ कोणती ? तज्ज्ञांचे म्हणणे काय?
हिवाळ्यात कोरडेपणामुळे सतत अंगाला खाज सुटतेय? करा हे घरगुती उपाय लगेच मिळेल आराम