मेरठमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळले, मृतांमध्ये पती-पत्नी आणि तीन मुलींचा समावेश

मेरठमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळले, मृतांमध्ये पती-पत्नी आणि तीन मुलींचा समावेश

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. लिसाडी गेट परिसरात एकाच कुटुंबातील पाच जणांचे घरात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. एका घरात पती-पत्नी आणि तीन मुलींचे मृतदेह आढळले. मोईन, पत्नी अस्मा, अफसा (8), अजीजा (4) आणि आदिबा (1) अशी मृतांची नावे आहेत.

मोईन हा मेकॅनिक म्हणून काम करायचा. मोईनच्या घरी काहीच हालचाल होत नसल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून पाहिले असता मोईन आणि त्याच्या पत्नीचे मृतदेह जमिनीवर पडले होते. तर तिन्ही मुलींचे मृतदेह बेडमध्ये होते. एक वर्षाच्या मुलीचा मृतदेह गोणीत भरून बेडमध्ये ठेवण्यात आला होता.

पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनेचा तपास सुरू केला आहे. सर्व मयतांच्या डोक्यावर जखमांच्या खुणा असल्याचे एसएसपींनी सांगितले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच सत्य समोर येईल, असेही ते म्हणाले.

याप्रकरणी मयत महिलेच्या तक्रारीवरून ज्ञात तीन जणांसह काही अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन नामांकित आरोपी आणि काही इतरांना ताब्यात घेतले आहे. एक आरोपी फरार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘राजकारणात उद्या काय होईल ते सांगता येईल का?’; उद्धव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य?  ‘राजकारणात उद्या काय होईल ते सांगता येईल का?’; उद्धव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य? 
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं कामकाज कुठपर्यंत झालं हे पाहण्यासाठी...
शिवसेनाप्रमुखांनी आत्मचरित्र का लिहिले नाही…उद्धव ठाकरे यांनी दिले उत्तर
गौरी खानचं खरं नाव माहितीये का? गौरीनेलग्नावेळी शाहरूखचंही बदललं होतं नाव
वामिका-अकायसोबत विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाला; मागितली ‘ही’ गोष्ट
कोल्ड ड्रिंक्स प्यायल्याने कॅन्सर होतो का? जाणून घ्या
पाकला घेरलं; तालिबानचा सैन्याच्या चौक्यांवर हल्ला, अणु प्रकल्पातील 16 कामगारांचं अपहरण
मराठमोळ्या सायलीचे पदार्पण आणि टीम इंडियाची विजयी सुरुवात, आयर्लंडचा केला 6 विकेटने पराभव