दैनिक सामना दिनदर्शिकेचे खासदार संजय राऊत यांचे हस्ते प्रकाशन
दैनिक सामना 2025 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक तथा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. दरवर्षी वेगवेगळ्या माहितीवर महाराष्ट्रातील ऐतिहासिक, धार्मिक, वैज्ञानिक विषय घेऊन दैनिक सामनाची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते. यावर्षी जागतिक किर्तीचे लोणार सरोवराची वैज्ञानिक, पौराणिक, ऐतिहासिक माहिती छायाचित्रासह 2025 च्या दिनदर्शिकेत राजेश देशमाने यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आली असून या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा मुंबई येथे दैनिक सामना कार्यालयात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते पार पडला. यावेळी दैनिक सामनाचे मुंबईचे सहाय्यक संपादक अतुल जोशी सुद्धा उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List