हिमाचल प्रदेशात दहा हजार पर्यटकांची सुखरूप सुटका
हिमाचल प्रदेशात मोङ्गय़ा प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. लाहौलच्या सिस्सू आणि कोकसरपासून अटल टनल रोहतांगपर्यंत बर्फात अडकलेल्या 8 हजार 500 आणि कुफरीमध्ये फसलेल्या 1 हजार 500 अशा जवळपास दहा हजार पर्यटकांना अनेक तासांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले. यासाठी संपूर्ण रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. मंगळवारी सकाळपासून कुफरी, नारपंडा, डलहौजी, सोलंगनालासह अनेक ठिकाणी हिमवृष्टी झाली. पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे तीन राष्ट्रीय महामार्गांसह राज्यातील 223 रस्ते वाहतूक बंद करावी लागली.
कुठे झाली बर्फवृष्टी
छितकुल, खदराला, शिलारू, जुब्बल, सांगला, निचार, कोकसर, सोलंग नाला, कुकुमसेरी, समदो, कल्पा, कुफरी, नारपंडा, रिकांगपिओ, भरमौर, शिमला, धर्मशाळा या ठिकाणी बर्फवृष्टी झाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List