आशा आहे की आजची रात्र आपली सुरक्षित जाईल, लॉस एंजेलिस आग प्रकरणी प्रियांका चोप्राची इंस्टापोस्ट चर्चेत
कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसमध्ये सध्या भयंकर अवस्था आहे. येथील जंगलात लागलेल्या आगीने प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जंगलात पसरत असलेल्या आगीमुळे लोकांना घर सोडून जावे लागत आहे. तर अग्निशमन दल सातत्याने लोकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही भीषण परिस्थिती पाहता कॅलिफोर्नियाचे राज्यपाल गेविन न्यूज़ॉम यांनी संपूर्ण शहरात आणीबाणी लागू केली आहे आणि घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. यावर आता देसी गर्ल प्रियांका चोप्नानेही रिअॅक्ट केले आहे.
प्रियांका चोप्राने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजवर लॉस एंजलीसमध्ये लागलेल्या भीषण आगीसंदर्भातील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तिने पहिली इंस्टा पोस्ट टाकत एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो तिने स्वत: शूट केला आहे. या व्हिडीओत स्पष्टपणे आगीच्या ज्वाला दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहीले की, या भयानक आगीत बाधित झालेल्या सर्वांसोबत माझ्या संवेदना आहेत. मला आशा आहे की आपण सर्वजण आज रात्री सुरक्षित राहू.”
प्रियांका चोप्राने शेअर केलेल्या दुसऱ्या व्हिडीओत रस्त्यावर काही गाड्या उभ्या आहेत आणि समोर जंगलात वेगाने आग पसरत आहे, लॉस एंजेलिसमध्ये आगीमुळे हजारो घरे जळून राख झाली आहेत. प्रियांकाने एक आणखी पोस्ट शेअर करत तिथल्या फायर ब्रिगेड टीमचे कौतुक करत आभारही मानले आहेत. तिने आपल्या इंस्टा स्टोरीवर लिहीले की, सगळ्यात पहिले या परिस्थितीत धाडस दाखवणाऱ्या सर्वांना सलाम, संपूर्ण रात्र काम करुन आगीत अडकलेल्या कुटुंबियांना वाचविण्यासाठी धडपड केल्याबद्दल आभार असे लिहीले आहे.
प्रियांका चोप्रा पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरी चोपडा सोबत लॉस एंजेलिसमध्ये राहते. 2018 मध्ये लग्न केल्यानंतर प्रियांका परदेशात शिफ्ट झाली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List