‘इस्रो’ची धमाकेदार वर्षअखेर, स्पॅडेक्स 30 डिसेंबरला लाँच होणार

‘इस्रो’ची धमाकेदार वर्षअखेर, स्पॅडेक्स 30 डिसेंबरला लाँच होणार

हिंदुस्थान अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे स्पॅडेक्स 30 डिसेंबर 2024 ला लाँच केले जाणार आहे. हे मिशन आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून रात्री 9.58 वाजता प्रक्षेपित होईल. स्पॅडेक्स मिशनद्वारे हिंदुस्थान हा स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान असलेला जगातील चौथा देश बनणार आहे. याआधी रशिया, अमेरिका आणि चीनने स्पेस डॉकिंगमध्ये यश मिळवले आहे. या मोहिमेद्वारे इस्रो अवकाशात वनस्पतींच्या पेशी कशा वाढतात याचे संशोधन करणार आहे. पीएसएलव्ही-सी60 रॉकेट स्पॅडेक्स मोहिमेद्वारे प्रत्येकी 200-200 किलो वजनाचे दोन अंतराळ यान घेऊन जाईल. यांना चेसर आणि टार्गेट असे नाव देण्यात आले आहे. संशोधन आणि विकासाशी संबंधित 24 पेलोडदेखील या वेळी पाठवले जाणार आहेत. हे पेलोड पृथ्वीपासून 700 किमी उंचीवर डॉक केले जातील. यापैकी 14 पेलोड्स इस्रोचे आहेत आणि उर्वरित 10 स्टार्टअप आणि शैक्षणिक संस्थांचे आहेत, असे इस्रोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

स्पेस डॉकिंग म्हणजे काय?

स्पेस डॉकिंग म्हणजे अंतराळात दोन स्पेसक्राफ्ट जोडणे. ही प्रक्रिया म्हणजे आकाशातील दोन कार जोडण्यासारखी आहे. स्पेसेक्स मिशन प्रथम स्पेसक्राफ्ट चेझरला दुसऱ्या अंतराळ यानाच्या लक्ष्याशी कसे वाहतूक आणि कनेक्ट करायचे याचे प्रात्यक्षिक दाखवेल. हे काम अतिशय बारकाईने केले जाईल, कारण अंतराळात गुरुत्वाकर्षण नसते आणि सर्व काही वेगाने हलते. डॅकिंग केल्यानंतर मात्र वाहने एकत्र काम करू शकतील.

एकाच वेळी संशोधन

या संशोधनांतर्गत अवकाशात आणि पृथ्वीवर एकाच वेळी प्रयोग केले जाणार आहेत. पालक वनस्पतीच्या पेशींना सूर्यप्रकाश व पोषक तत्त्वे यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी एलईडी लाईट्स आणि जेलच्या माध्यमातून पुरवल्या जातील. पॅमेरा वनस्पती पेशींचा रंग आणि वाढ रेकॉर्ड करेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निवडणुकीआधी महिलांना पैसे वाटप? भाजप नेत्यांविरोधात ED कडे ‘आप’ने दाखल केली तक्रार निवडणुकीआधी महिलांना पैसे वाटप? भाजप नेत्यांविरोधात ED कडे ‘आप’ने दाखल केली तक्रार
दिल्लीत विधानसभा निवडणुकीची तारीख कधीही जाहीर होऊ शकते. यातच निवडणूक जाहीर होण्याआधी भाजप नेते प्रवेश वर्मा यांनी दिल्लीत महिलांना पैसे...
Cristiano Ronaldo – हाडं गोठवणारी थंडी, रोनाल्डो उणे 20 डिग्री थंड पाण्यात उतरला
परभणी व बीड हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न, नाना पटोले यांचा आरोप
रघुपती राघव राजा राम… गांधीजींचं भजन म्हटल्याने भाजप नेते लोकगायिकेवर संतापले! मंचावरच माफी मागायला लावली
पेपरफुटी विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन, पोलिसांचा लाठीमार; भाजप सरकारवर राहुल गांधी संतापले
IPL मध्ये अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंचं विजय हजारे स्पर्धेत वादळ; 96 चेंडूत 126 धावा चोपत 3 विकेटही घेतल्या
अंध-दिव्यांगही रस्ता बिनधास्त ओलांडणार, तीन हात नाक्यावर बीप वाजणार, रॅम्प बसवणार